महाअपडेट टीम : 15 मार्च 2022 : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वीज तोडणी संदर्भात चांगलीच खडाजंगी झाली. या मुळे काही काळ सभागृह दुपारी एक वाजता स्थगित करावं लागलं होतं.
ठाकरे सरकारकडून सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे, असा आरोप करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वक्तव्याची म्हणजे दादांनी म्हंटल होतं की. मे पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज कापली जाणार नाही…
या गरदोळा नंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज तोडणी संदर्भात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत होणार असून शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत वीज तोडणी तीन महिने तात्पुरती थांबवली जाणार आहे.
त्याशिवाय वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांची वीजसुद्धा पुर्ववत केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहात सांगितले. शेतकऱ्यांच्या वीज तोडणी हा सभागृहातील मोठा चर्चेचा विषय होता.
त्यात उर्जामंत्र्यांनी पिक हातात येईपर्यंत म्हणजेच पढील तीन महिने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नसून, वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांचादेखील वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाणार असल्याची घोषणा उर्जामंत्री राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या घोषणेनंतर शतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.