मुंबई : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने ‘शेरशाह’मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि अभिनेत्री कियारा रिलेशनमध्ये आल्याचे देखील बोलले जाते. शेरशाहमधील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती.
पण, आता कियारा आणि सिद्धार्थ वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. दोघांनी एकमेकांना भेटणे आणि बोलणे बंद केले आहे. यादरम्यान, सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला असून या फोटोला दिलेल्या कॅप्शनची आता जोरदार चर्चा होत आहे.
या फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा समुद्राच्या मधोमध दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बिना सनशाइन के एक दिन. आप भी जानते हैं… रात’.
सिद्धार्थ मल्होत्राच्या पोस्टवरून अशी अटकळ बांधली जात आहे की, त्याची पोस्ट कियारा अडवाणीसाठी आहे, त्याच्या या कॅप्शनमुळे ब्रेकअपच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. अनेक यूजर्स फोटोवर कमेंट करत कियाराला वेगळे होण्यामागचे कारण विचारत असल्याचे म्हंटले आहे. तर दुसरीकडे, अनेकांनी त्याच्या जबरदस्त स्टायलिश लूकचे कौतुकही केले आहे.
या वृत्तांवर आतापर्यंत सिद्धार्थ किंवा कियारा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांनीही त्यांच्या प्रेमजीवनावर किंवा ब्रेकअपवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दुसरीकडे, या कपलचे चाहते त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकवेळा दोघेही एकत्र व्हेकेशनवर जाताना दिसले. त्यांनी त्याच ठिकाणाहून त्यांचे फोटो देखील शेअर केले, परंतु दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या वृत्ताला कधीही पुष्टी दिली नाही.