महाअपडेट टीम, 5 फेब्रुवारी 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आज शिक्रापूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या सुधारीत युनिटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिरूर येथे आले होते.
आज त्यांनी दिवसभर कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या सोबत राहिल्याने ते अशोक बापूंच्या कार्यपद्धत पाहून भारावून गेले. बापूंनी शिरूर तालुक्यासह शहरात लावलेला विकास कामांचा धमाका पाहून त्यांनी एक जाहीरपणे भविष्यवाणी केली.
ते म्हणाले की, ‘मोठ्या साहेबांनी ठरवलं, तर अशोक पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील. किसके नशीब का क्या बोले…! अशी भविष्यवाणी जाहीरपणे केल्याने आ. अशोक बापू समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
यावेळी त्यांनी आ. अशोकबापू पवार व त्यांच्या पत्नी मा. सभापती, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांच्याशी त्यांच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा केली. त्यांच्या कामकाजाची पद्धत जाणून घेतली.
यावेळी त्यांनी शिक्रापूरच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात त्यांनी सुजाता पवार यांच्याकडूनच पवार यांच्या कामकाजाची, प्रश्नांना भिडण्याची, ती सोडविण्याच्या पद्धतीची माहिती घेतली. त्या सर्व मुद्द्यांचा समावेश करीत त्यांनी आपल्या सर्व भावना कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केल्या.
आ. पवार हे डोअर टू डोअर जनसंपर्क असलेले नेते आहेत. त्यामुळे मतदार संघात कामांबाबतच्या अपेक्षा आ. पवार यांच्याकडुन जास्त आहेत. शिरूर हवेली हे दोन तालुके सांभाळताना केलेल्या विकासकामांबद्दल कार्यकर्ते कार्यकर्ते आ. अशोकबापू यांच्यावर चांगला अनुभव असल्याचे नमूद करतात.
एवढे उत्तम काम करणाऱ्या आमदार पवारांबाबत मोठ्या साहेबांनी ठरवलं, तर ते राज्याच्या मंत्रिमंडळात दिसल्यास वावगे वाटू नये, किसके नशीबा का क्या बोले…! असे म्हणत खडसेंनी शिरुर-हवेली मतदार संघ भाग्यवान असल्याचे सांगितले.