मुंबई, दि. ८ : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या वैचारिक आणि अभ्यासपूर्ण लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री. चपळगावकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे संयुक्तिकच आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची परंपरा मोठी आहे आणि श्री. चपळगावकर यांच्यामुळे ती अधिक समृद्ध होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.