काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने (ED) आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यातच आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच आता पाटोळे यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवर (Bjp) जोरदार हल्ला चढवला आहे.

यावेळी बोलताना पटोले यांनी ‘सौ सोनार की एक लोहार की, आमच्याकडे मसाला तयार आहे, आम्ही दणका देणार’, असा शब्दात भाजपला थेट इशारा दिला आहे. तसेच भाजप जे कटकारस्थान रचत आहे त्याविरोधात मोहीम आखणार असल्याचेही पटोले यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर नाना पटोले आक्रमक होत म्हणाले, ही अघोषीत आणीबाणी असून त्याविरोधात उद्रेक होणं निश्चित आहे. भाजप देशात हुकुमशाही आणतंय. भाजप आणि मोदींविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर ईडीच्या धाडी सुरु आहेत.

आम्ही केंद्रीय तसाप यंत्रणांविरोधात रणनिती आखणार. भाजप स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. पण लोकशाहीत जनता मोठी असते, हे भाजपला कळायला हवं. आता जनताच त्यांना धडा शिकवेल, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर निशणा साधला आहे.

Leave a comment

Your email address will not be published.