मुख्यमंत्री जनगौरव समिती, ठाणे यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम “मुख्यमंत्री जनगौरव सोहळा” मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दि. 26 रोजी रात्री 8:30 वा. प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ठाणे शहरातून निघालेली स्वागत यात्रा, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेला सत्कार व गौरव समारंभ, नामवंत कलावंतांनी सादर केलेले

सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रकट मुलाखतीची झलक रसिकांना पहायला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री जनगौरव समिती, ठाणेचे समन्वयक जयु भाटकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.