ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवार्ड इन पॉवर अँड एनर्जी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाचे आणि ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे अभिनंदन केले आहे.

स्कॉच ग्रुपच्यावतीने ऊर्जा विभागाला 2021 मधील कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, महापारेषण कंपनीने राज्यातील दुर्गम तसेच शहरी भागात प्रभावी पारेषण प्रणाली राबवली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून सुमारे 12 हजारांहून अधिक घरांना वीजजोडणी देण्यात आली. विशेषत: कोरोना काळ, तौक्ते व निसर्ग चक्रीवादळ तसेच पूर परिस्थितीतही वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी आपले ऊर्जा विभागातील अधिकारी–कर्मचारी अहोरात्र राबत होते. हा पुरस्कार म्हणजे या सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे. त्यासाठी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

Leave a comment

Your email address will not be published.