मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनी आता फिल्मी दुनियेत प्रवेश करणार आहे. IPL 2022 नंतर याबाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते. CSK कर्णधार एमएस धोनी सध्या मुंबईत असून IPL खेळत आहे.

महेंद्रसिंग धोनी हा केवळ आयपीएलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली विश्वचषक, T20 विश्व आणि अनेक ट्रॉफी देशाला जिंकून दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एमएस धोनी आता निर्माता बनून तमिळ चित्रपट उद्योगात (कॉलीवूड) प्रवेश करू शकतो.

रिपोर्ट्सनुसार, धोनी तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्माता बनून या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. या निर्मितीसाठी सध्या काम सुरू असून, एक मजबूत टीम तयार केली जात आहे. IPL 2022 नंतरही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

एमएस धोनी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे, आजही त्याचे लाखो आणि देशातील इतर क्रिकेटर्सपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त एमएस धोनी शेती देखील करतो. तो रांची येथील फार्म हाऊसवर शेती करतो, याचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सीएसकेसाठी 4 ट्रॉफी जिंकल्या आहेत. या हंगामापूर्वी (2022) धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नवीन कर्णधार जडेजाच्या खराब कामगिरीनंतर पुन्हा एकदा धोनीच्या हाती कमान आली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.