2022 आयपीएलच्या पहिल्या फेरीत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. ऑरेंज कॅप टेबलमध्ये जोस बटलर आघाडीवर आहे, उर्वरित अव्वल 10 मध्ये फक्त तीन परदेशी खेळाडू आहेत, तर KL राहुल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे सारखे भारतीय खेळाडू देखील यामध्ये सामील आहेत.

शिखर धवनने आतापर्यंत 205 धावा केल्या असून इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानने त्याच्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. स्वानने त्याला मिस्टर आयपीएल म्हणून संबोधले आहे. स्वानने स्टार स्पोर्ट्सवर दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की, स्पष्टपणे तो त्याच्या फॉर्ममध्ये आहे. तो मिस्टर आयपीएल आहे आणि मला त्याची फलंदाजी पाहणे आवडते.

स्वान पुढे म्हणाला की, “शिखर धवन त्याच्या डावाच्या सुरुवातीला षटकार मारण्यासाठी एक्स्ट्रा कव्हरवर एक शॉट खेळतो तेव्हा तुम्हाला कळते की तो चांगल्या फॉर्मयामध्ये आहे. शिखर धवनचे हे काही जुने शॉट्स आहेत. तो फ्लिक्ससह लेग साइडवर उत्कृष्ट आहे, तो अप्रतिम आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम धवनच्या नावावर आहे. गेल्या मोसमात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. यावर्षी त्याला संघातून वगळण्यात आले. धवन यावेळी पंजाब किंग्जकडून खेळताना चांगला दिसत आहे. अशा परिस्थितीत स्वानने त्याला मिस्टर आयपीएल म्हणत काहीही चुकीचे बोलले नाही असे म्हणता येईल.

Leave a comment

Your email address will not be published.