महाअपडेट टीम, 7 फेब्रुवारी 2022 : भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास निधन झालं. मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी शिवाजी पार्कातराजकारणातील दिग्गज मंडळींनी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली.

यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं.त्यांच्यापाठोपाठ राज्यपाल, आदित्य ठाकरेसाहेब आणि रश्मीताई ठाकरे यांनीही अंत्यदर्शनं घेतलं. दरम्यान, शरद पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे यांनीही यावेळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली.

दरम्यान, आदर पूर्वक जायला हवं, म्हणून ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या शरद पवारसाहेब यांनी आपल्या पायातील बूट खालीच काढले होते. यानंतर ते खाली उतरले तेव्हा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे पाऊल उचललं, ते कौतुकास्पद होतं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

वडीलांना त्रास होतोय, कष्ट घ्यावे लागतील, त्यांना मदतीची गरज आहे, हे लगेचच सुप्रियाताई सुळे यांनी हेरलं. आपल्या पदाचा, राजकीय वलयाचा कसलाही विचार मनी न बाळगता,

सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या बाबांना अर्थात शरद पवारसाहेब यांना पायात बूट घालण्यासाठी त्या लगेचच पुढे सरसावल्या. यावेळी समोरच बसलेल्या नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.

सुप्रियाताई सुळे यांनी शरद पवारसाहेब यांना एका खूर्चीवर बसवलं. आपण स्वतः गुडघ्यावर बसून त्यांनी वडिलांच्या पायात बूट घालून देत त्यांची सेवा केली. आपल्या हातांनी त्यांनी केलेली ही गोष्ट छोटीशी जरी असली, तरी कॅमेऱ्यात टिपली गेली, जिला महत्त्व आलं नसतं तरच नवल !

सुप्रियाताई सुळे आणि शरद पवारसाहेब हे एकत्र लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. आपल्या बाबांची मदत करण्यासाठी, त्यांना काहीही कमी-जास्त व्हायला नको, त्रास व्हायला नको, याची काळजी घेताना खासदार सुप्रियाताई सुळे यावेळी बापाची सेवा करताना दिसून आल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून अनेकजण बाप आणि लेकीच्या नात्याचं कौतुक करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *