अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी जोरदार टीका केली आहे. नवनीत राणा यांनी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली असून त्या बोगस आहेत असे वक्तव्य मोहिते यांनी केले आहे.

सविस्तर वृत्त असे, राष्ट्रवादीच्या वतीने अमरावतीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना त्यांची जीभ घसरली.

ते म्हणाले खासदार नवनीत राणा या बोगस आहेत, त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करावे. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

येथे काम करण्याची संधी आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली आहे. माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी उच्च न्यायालय व एका वृत्तपत्रातील लेखाचा हवा ला देत अमरावती च्या खासदार नवनीत राणा बोगस असल्याची टिप्पणी केली.

Leave a comment

Your email address will not be published.