भारताचे माजी कर्णधार वीनू मंकड यांचा मुलगा राहुल मंकड यांचं निधन झालं आहे. राहुल मंकड हे मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले.
राहुल मंकड यांना या महिन्याच्या सुरूवातीला हृदयविकाराचा धक्का लागला, यानंतर त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते.
वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. राहुल यांच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्नावर शोककळा पसरली आहे.
राहुल मंकड हे शानदार बॅट्समन होते. राहुल मंकड यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 2 मुली आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राहुल यांनी 47 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 5 शतक आणि 12 अर्धशतकांसह 2 हजार 111 धावा केल्या. राहुल यांची 162 ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती.
राहुल यांचं क्रिकेटसोबत अगदी जवळच नातं होतं. राहुल यांचे बंधु अशोक आणि अतुल हे दोघे क्रिकेटर होते. अशोक यांनी टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
तर अतुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं. राहुल हे 1972-73 पासून ते 1984-85 पर्यंत क्रिकेट खेळले. राहुल यांनी अनेक सामन्यांमध्ये बॉलिंगही केली होती. त्यांनी आपल्या किकेट कारकिर्दीत 7 विकेट्स घेतल्या होत्या