एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यात अनेक बदल होतील याचे संकेत त्यांनी आधीपासूनच दिले होते. ते आता दिसून लागले आहेत.

सध्या मोफत असलेली ही सेवा यापुढे सशुल्क होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर नवे मालक मस्क यांनीही सूचक उत्तर दिले आहे या चर्चांवर मस्क यांनी म्हटले आहे, “ट्विटर हे सर्वसामान्य युजर्ससासाठी कायमच मोफत राहील.

मात्र, व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना थोडे पैसे मोजावे लागू शकतात.” यावरून आता ट्विटरचे हौशी आणि व्यावसायिक असे प्रकार होण्याची शक्यता आहे.

या माध्यमातून पैसे कमावणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांना ट्विटरला त्यातील काही वाटा द्यावा लागण्याची शक्यता आहे. मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरमध्ये मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरची खरेदी केली आहे.

याआधी मस्क यांनी ट्विटरमधला ९.२ टक्के भाग खरेदी केला होता. तेव्हा ते ट्विटरचे सर्वात मोठे भागधारक होते. पुढे चालून त्यांनी १४ एप्रिलला ट्विटर खरेदी केले.

आता एलॉन मस्क हे यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य यूजरला अधिक भाषण स्वातंत्र्य देताना व्यावसायिक कंपन्यांच्या मात्र खिशात हात घातला जाण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Your email address will not be published.