महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2022 : ‘पुष्पा’ चित्रपटाने केवळ तरुणाची नव्हे तर राजकारण्यांनाही वेड लावले आहे. जाहीर भाषणांतूनही याची प्रचिती येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदी क्षीरसागर यांनीही आपल्या जाहीर भाषणातून एका सभेत ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नही साला’ हा डायलॉग वापरण्याचा मोह आवरला नाही.
निमित्त होतं बीड जिल्ह्यात झालेल्या एका सभेचं. या सभेतच बोलताना आमदार क्षीरसागरांनी डायलॉगबाजी करत उपस्थितांना खळखळून हसवलं.आणि अनेकांवर टोलेबाजीही केली.
विरोधकांवर जोरदार प्रहार करत संदीप क्षीरसागर यांनी एक तीर दोन निशाणे साधण्याचा प्रयत्न केला. विरोधक आमच्या विरुद्ध एकत्र येऊन लढणार आहेत. कितीही लढा. जोपर्यंत माय-माऊलींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. तोपर्यंत मला काही फरक पडणार नाही.
एवढीमोठी निवडणूक लढली, ही तर नगरपालिकेची निवडणूक. त्याचं काय एवढं. अलिकडेच मी एक पिक्चर पाहिला. खूप दिवसांनी पिक्चर पाहिला. या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे. ‘झुकेगा नही साला’…
दरम्यान, संदीप क्षीरसागर यांनी स्टेजवरुन डायलॉगबाजी करताच उपस्थितांनाही हसू आवरले नाही. त्यांनीही टाळ्यांचा कडकडाट करत क्षीरसागर यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. एकूणच काय तर राजकारण्यांमध्येही पुष्पा चित्रपटाची क्रेझ चांगलीच पाहाला मिळत आहे.
Pushpa Video: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांना 'पुष्पा'ने लावले वेड; म्हणतात…! pic.twitter.com/NCVgI8uGPH
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2022