महाअपडेट टीम, 29 जानेवारी 2022 : शिरूर – हवेली तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार अन् त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सभापती सौ. सुजाता अशोक पवार या लोकांच्या सेवेसाठी 24 तास सक्रिय असतात. अनेक लोकांच्या अडी – अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र धडपडत असतात. अशीच एक अनुभूती ही वडगाव रासाई येथील बुवासाहेब गोविंदराव पवार यांना आली.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार हे काही कामानिमित्त मध्यप्रदेशात चार ते पाच दिवसांसाठी गेले होते. यावेळेस मतदारसंघातील उरळगाव येथील हृदयविकाराने पीडित असलेले भानुदास बर्वे यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
याबाबत नातेवाईकांनी आमदार अशोक पवार यांना संपर्क करत माहिती दिली. आमदारांनी देखील मध्यप्रदेशमध्ये असतानासुद्धा विनाविलंब रुबी प्रशासनासोबत संपर्क साधून पेशंटचे बिल कमी करून दिले.
तसेच वडगाव रासाई येथील बुवासाहेब गोविंदराव पवार यांना पॅरालिसीस अटॅक आल्यामुळे त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. यांचेही 1 लाख 10 हजार रुपयांचे बिल आमदार अशोक पवार यांनी फोन द्वारे हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधत ते माफ करून दिले.
या आधीही अशोकबापू पवार अन् त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सभापती सौ. सुजाता अशोक पवार यांनी लाईफलाईन खाजगी हॉस्पिटल असताना देखील भाभीच्या एका फोनमुळे सामान्य कुटुंबाला बिलामध्ये सात हजार रुपयाचा सवलत मिळून ठकुबाई सखाराम पांढरे यांना आर्थिक दिलासा मिळाला होता.