महाअपडेट टीम, 3 मार्च 2022 : गुनाट (कोळपेवाडी) ता.शिरूर येथील तरुण शेतकरी राजेंद्र कोळपे यांना त्यांच्या जमिनीत दगड खाण उभारणीसाठी पर्यावरण खात्याची परवानगी हवी होती. तसा त्यांनी ऑनलाईन अर्जही केला होता.
पण त्यांना परवानगी मिळण्यास अडचणी येत होत्या. मग त्यांनी, केशवकाका लगड, शरद चोरमले आणि दत्तात्रय लगड या तरुण शेतकर्यांना बरोबर घेऊन थेट मंत्रालयच गाठलं. मंत्रालयात आमदार अशोक पवार यांची भेट घेतली.
आमदार पवार या तरुण शेतकर्यांना पर्यावरण राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. आणि संबंधित विषया संदर्भात पत्रही दिलं. मंत्री महोदयांनी आमदार पवारांच्या पत्राची दखल घेतली. आणि दगड खान उभारणीला संबंधितांना पत्र देऊन परवानगी देण्याची हमीही दिली.
आमदार पवारांनी काम मार्गी लावल्यानंतर या तरुण शेतकर्यांना मंत्रालय फिरुन दाखवलं. आमदार पवारांचं मंत्रालयातील काम बघून हे तरुण शेतकरी अक्षरशः भारावून गेले.