महाअपडेट टीम, 18 फेब्रुवारी 2022 : शिरूर – हवेली तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार अन् त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सभापती सौ. सुजाता अशोक पवार या लोकांच्या सेवेसाठी 24 तास सक्रिय असतात.
अनेक लोकांच्या अडी – अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र धडपडत असतात. अशीच एक अनुभूती ही बाबुरावनगर मधील मधुकर तांबे येथील यांना आली.
झालं असं की, बाबूराव नगर, शिरूर येथील श्री.मधुकर तांबे यांना म्युकर मायकोसिस हा आजार झाला होता. उपचार करून सुद्धा आजार बरा होत नसल्याचे पाहून डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. तांबे यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जाणे शक्य नव्हते.
मात्र मित्र आणि नातेवाइकांच्या मदतीने त्यांना मोठ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे 2 दिवसांचा खर्च 1 लाख रुपये होता. तेव्हा कसेबसे जमवलेले 5 लाख रुपये काही दिवसांमध्येच संपले. शेवटी पैशा अभावी उपचार थांबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी आपल्या अशोकबापूंना संपर्क साधून पाहिला.
बापूंना ही बाब कळताच नेहमीप्रमाणे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच रुग्णालय प्रशासनाला संपर्क साधून श्री.मधुकर तांबे यांचा संपूर्ण उपचार मोफत करण्याच्या सूचना दिल्या. एवढ्यावरच न थांबता बापूंनी धर्मादाय आयुक्तांकडे मागणी करत शस्त्रक्रियेसाठी लागणारा साडेचार लाख रुपयांचा खर्च सुद्धा माफ करून दिला.
आज श्री.मधुकर तांबे संपूर्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. बापुंमुळे त्यांना जीवनदान मिळाला अशी त्यांची भावना आहे. बापूंना एकदा भेटण्याची त्यांची इच्छा होती. बापूंनी ती इच्छा सुद्धा पूर्ण करून त्यांना दिलासा दिला.