महाअपडेट टीम, 14 फेब्रुवारी 2022 : सणसवाडी मधील आनंदनगर येथील लोकवस्तीत धोकादायक विद्युत तारा काढून टाकण्यासाठी स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या विद्युत तारा काढून टाकण्यासाठी नागरिकांनी वर्गणी गोळा केली होती.
ही बाब स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार अशोक बापू पवार यांना कळवली. आ. अशोक बापू यांनी तात्काळ सूत्रे हलवत तातडीने महावितरणला तारा बदलून तेथे एरियल बंच केबल टाकण्याच्या सूचना केल्या.
महावितरणाचे अधिकारी येडके आणि महाजन साहेब यांनी तातडीने कारवाई करत पाच लाख रुपये निधीचा वापर करत धोकादायक विद्युत तारा काढून त्याजागी एरियल बंच केबल टाकण्यात आली.
यावेळी आ. अशोक पवार यांनी व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, सणसवाडी गावच्या सरपंच स्नेहल भुजबळ, उपसरपंच सागर दरेकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिकांनी आ. अशोक बापू पवार यांचे आभार मानले.
तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी दिनांक 11 फेब्रुवारी सणसवाडी ( ता.शिरूर) येथील वसेवाडी आमदार अशोक पवार यांच्या आमदार फंडाच्या माध्यमातून व जिल्हा परिषद सदस्या व माजी सभापती सुजाता पवार,पुणे जिल्हा नियोजन समितीचे पंडित यांच्या विशेष प्रयत्नांतून विविध विकासकामांच्या व उद्घाटन समारंभ यांच्या हस्ते 58 लाखाच्या विकासकामांचा उदघाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडला आहे.