महाअपडेट टीम, 5 फेब्रुवारी 2022 : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल आमदार अशोक पवार यांचा उरळगाव ग्रामस्थ व प्रशांत सात्रस मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, शिरूर बाजार समितीचे सभापती वसंतराव कोरेकर, उरळगाव सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत सात्रस, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष रणदिवे, सरपंच आप्पासाहेब बेनके, चांगदेव पिंगळे, रवींद्र गिरमकर, अशोक कोळपे आदींनी मनोगत व्यक्त केले.
उरळगावकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे, त्यामुळे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही आमदार अशोक पवार यांनी याप्रसंगी दिली.
या कार्यक्रमात आमदार अशोक पवार यांची शिवाजी सात्रस यांच्या वतीने लाडू तुला करण्यात आली.
याप्रसंगी शिवाजी वडघुले, नानाभाऊ सात्रस, संदीप सात्रस, तुकाराम गिरमकर, संतोष सात्रस, रामभाऊ गिरमकर आदी उपस्थित होते.