नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने सांगितले की, मुंबई विमानतळावर विस्तारा एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी त्याच्या सोबत गैरव्यवहार केला. त्यांना वाईट वागणूक मिळाली असे खेळाडूचे म्हणणे आहे. या प्रकरणी विस्ताराने म्हटले आहे की आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना केल्या जातील. इरफानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी विस्तारा फ्लाइटने मुंबईहून दुबईला जात होतो.

चेक-इन काउंटरवर मला खूप वाईट अनुभव आला. विस्तारा जाणून बुजून माझे तिकीट वर्ग कमी करत होता जे कन्फर्म बुकिंग होते. प्रकरण मिटण्यासाठी मला काउंटरवर थांबावे लागले. तेथील ग्राउंड स्टाफ मला नुसती करणे देत होता, आणि माझा वेळ घालवत होता.

त्वरित कारवाईची मागणी

बुधवारी संध्याकाळी पठाणच्या ट्विटला उत्तर देताना नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, “इरफान सोबत घडलेली घटना ऐकून वाईट वाटले, विस्ताराला चौकशी करून उत्तर द्यावे लागेल.” बुधवारी पठाण म्हणाला की, माझ्यासोबत माझी पत्नी, माझे 8 महिन्याचे बाळ आणि 5 वर्षाचे मूलही माझ्यासोबत होते. किंबहुना, काही प्रवाशांनाही असाच अनुभव आला. मला समजत नाही की त्यांनी फ्लाइटचे ओव्हरसेल्ड का केले आणि व्यवस्थापनाने ते कसे मंजूर केले?” त्यांनी ट्विट करून त्वरित कारवाईची मागणी केली.

प्रतिउत्तरात विस्ताराने ट्विट केले की, एअरलाइनला याबद्दल खूप काळजी आहे आणि ती या घटनेची प्राधान्याने चौकशी करत आहे. विस्तारा यांनी गुरुवारी ट्विटरवर सांगितले की एअरलाइनने त्यांच्याद्वारे सामायिक केलेल्या सर्व तपशीलांची नोंद घेतली आहे आणि “आवश्यकतेनुसार सर्व सुधारात्मक उपाय केले जात आहेत”. विमान कंपनीला उत्तर देताना पठाण धन्यवाद म्हणाला.