अभिनेत्री सोनम कपूरशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सोनम आणि पती आनंद आहुजाच्या दिल्लीतील घरात करोडोंची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना फेब्रुवारी महिन्यातील सांगितली जात आहे जेव्हा सोनम कपूरच्या सासरच्यांनी तुघलक रोड पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती.
हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी आत्तापर्यंत ही बातमी गुपित ठेवली होती. क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीम पुरावे गोळा करण्यात गुंतलेली आहे.
अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा, सासू प्रिया आहुजा आणि आनंद आहुजाची आजी सरला आहुजा दिल्लीतील अमृता शेरगिल मार्गावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहतात.
या घरातून चोरट्यांनी 1.41 कोटींचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. सोनमच्या सासूने तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी तिच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, दिल्ली पोलिस 25 कर्मचारी, 9 केअरटेकर, ड्रायव्हर, माळी आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा (एफआयआर क्र. 41/22) नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलीस आता एक वर्षाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तुघलक रोड पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. सोनम कपूरचा पती आनंद आहुजा काका सुनीलसोबत कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तो वारंवार येतो आणि जातो.
दरम्यान, सोनम आणि आनंद सध्या मुंबईत आहेत. हे जोडपे आपल्या पहिल्या मुलाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या जोडप्याने हि बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानंतर बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.