भारतीय संस्कृतीत मेहंदी ही प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवत असते. जसे सण, उत्सव, लग्नसोहळे अशा विविध कार्यक्रमात मेहंदीचे महत्व स्त्री शृंगारात अनन्यसाधारण आहे. मेहंदीमुळेच नववधूंचा पेहराव उठून दिसतो. म्हणून नववधू मेहंदी चांगल्याप्रकारे काढण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा असे घडते की मेहंदी रंगतच नाही.

याप्रमाणेच, आपली मेहंदी उठाव व खुलून दिसावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. म्हणून हा मेहंदीचा रंग जास्तीत जास्त डार्क दिसावा यासाठी महिला खूप प्रयत्न करतात. मात्र मेहंदी न रंगण्यासाठी आपल्याच काही चुका यासाठी कारणीभूत असतात. त्या कोणत्या ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर जाणून घ्या मेहेंदीची काळजी कशाप्रकारे घ्यावी.

वेळेचा अभाव

तुम्ही लग्नासाठी किंवा कोणत्याही प्रसंगी मेहंदी लावत आहात, लक्षात ठेवा की त्या कार्याच्या एक किंवा दोन दिवस आधी मेहंदी लावली पाहिजे. कारण मेहंदीचा पूर्ण रंग येण्यासाठी किमान २४ ते ४८ तास लागतात. तसेच, हातावर मेंदी ६-७ तासांपेक्षा जास्त ठेवू नका. यामुळे मेहंदी काळी पडणार नाही.

मेहंदी सुकू देऊ नका

सहसा, बरेच लोक मेहंदी लावतात आणि तशीच सोडतात, ज्यामुळे मेहंदी सुकते आणि पडते. त्यामुळे हाताला मेहंदी चिकटत राहण्यासाठी काही वेळ कापसाच्या मदतीने मेहंदीवर लिंबाचा रस आणि साखरेचे द्रावण लावत राहा. तसेच, मेहंदीचा रंग पूर्णपणे गडद करण्यासाठी तुम्ही लवंगाचा धूर घेऊ शकता. यासाठी तव्यावर लवंग टाका आणि त्याच्या धुरात हात बेक करा.

देशी तूप लावावे

मेहंदी सुकल्यानंतर तुम्ही ती काढून हात धुवा. पण मेहंदी लावण्याची प्रक्रिया इथेच संपत नाही. मेहंदी काढल्यानंतर कोमट देसी तूप किंवा बाम हातावर लावायला विसरू नका, यामुळे मेहंदी बराच काळ टिकते. तसेच मेहंदी लावल्यानंतर त्या भागावर वॅक्सिंग किंवा शेव्हिंग टाळा.

मेहंदीची अशी काळजी घ्या

मेहंदी लावण्यापूर्वी, त्वचा स्वच्छ करणे आणि मॉइश्चरायझर लावणे खूप महत्वाचे आहे. यामुळे मेहंदीतील रसायनांचा परिणाम त्वचेवर होणार नाही. तसेच मेहंदी घट्ट ठेवण्यासाठी हातांवर साबणाचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

Leave a comment

Your email address will not be published.