अहमदनगर : पोलीस भरती (Police recruitment) करणाऱ्या मुला – मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल अहमदनगरमध्ये माहिती दिली आहे.

सध्या पोलीस भरतीबद्दल त्यांनी सांगितलं की, 5 हजार 200 पोलिसाची भरती करण्याचे काम पूर्वतत्वचे दिशेने असून लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी शारीरिक परीक्षा झाल्या असून अंतिम यादी जाहीर करणे बाकी आहे . त्यानंतर आता 7 हजार 200 पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.त्यामुळे सर्व पोलीस भरती करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे .

मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *