सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी लोक वेगवगेळे महागडे प्रयोग करतात. पण त्वचेच्या सुंदरतेसाठी अनेकजण खूप सोपा उपाय म्हणजेच बॉडी मसाजही करत असतात.

बॉडी मसाज करणे फक्त त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की केवळ बॉडी मसाजच नाही तर हाताने मसाज केल्यानेही अनेक फायदे होतात.

शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि त्वचा सुधारण्यासाठी, शरीराची मालिश करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण काही वेळा व्यस्त वेळापत्रकामुळे लोकांना फुल बॉडी मसाज करायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत गरम तेलाने हातांची मसाज करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया हँड मसाजच्या पद्धती आणि त्याचे काही फायदे.

हातांची मसाज करण्याच्या टिप्स:

घरी हातांना मसाज करण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल काढा. आता हे तेल हलके गरम करून हातांना लावून हलक्या हातांनी मसाज करा. त्याचबरोबर हातांसोबतच नखांचीही मसाज करायला विसरू नका.

त्वचा मऊ राहील

हातांनी मसाज केल्याने त्वचेचा रंग सुधारतो आणि त्वचा खूप चमकू लागते. अशा परिस्थितीत कोमट खोबरेल तेलाने हातांची मालिश करू शकता. त्यामुळे हातांच्या स्नायूंनाही आराम वाटतो तसेच त्वचाही घट्ट राहते.

हात दुखणे दूर होईल

अनेक वेळा कठोर परिश्रम केल्यावर हाताला तसेच बोटांमध्ये खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत गरम तेलाने मसाज केल्याने स्नायूंना खूप आराम मिळतो आणि हातातील वेदना लगेच दूर होतात.

मूड सुधारण्यास उपयुक्त

हाताची मसाज अनेक लोकांसाठी तणाव दूर करण्याचे काम करते. कोमट तेलाने हातांना मसाज केल्याने संपूर्ण शरीराला आराम मिळतो आणि तुमचा मूड चांगला राहतो.

झोपेची कमतरता दूर करण्याचा उपाय

अनेक वेळा लोकांना रात्री झोप येत नाही आणि बाजू बदलल्यावरच सकाळ होते. अशा स्थितीत हातांची मसाज करून तुम्ही झोप न येण्याच्या समस्येवर मात करू शकता. कोमट तेलाने हातांना मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. जे तुम्हाला झोपेसह शरीराच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.

नखे मजबूत होतील

हातांना मसाज करूनही नखांची विशेष काळजी घेता येते. नियमितपणे हातांची मसाज केल्याने नखांमधील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. ज्यामुळे तुमची नखे मजबूत आणि चमकदार होतात.