चालू वर्षी, वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक कार कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यातच आता भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असणाऱ्या म्हणजेच मारुती सुझुकीनेही ग्राहकांना मोठा झटकाच दिला आहे. त्यांनी त्यांच्या कारच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.

यात त्यांनी १८ एप्रिल २०२२ पासून गाड्यांच्या किंमतीत १.३ टक्कयांनी वाढ करणार असल्याचे सांगितले आहे.यामुळे मारुती सुझुकीच्या ग्राहकांना मोठा झटकाच बसला आहे. चला तर मग जाणून घेऊ की कोणकोणत्या गाड्यांच्या किमती कशाप्रकारे वाढवल्या आहेत.

जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत किंमतीत मोठ्या प्रमाणात बदल केले.

तसेच कंपनीने जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान कंपनीने आपल्या कारच्या किंमती सुमारे ८.८ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.त्यासोबतच याही वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत, ज्या वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार वाढवल्या आहेत.भारतीय बाजारपेठेत कंपनीच्या मारुती अल्टोपासून ते एस-क्रॉसपर्यंत गाड्या विकल्या जात आहेत.

महिंद्रानेही आपल्या कारच्या किंमती वाढवल्या

ही वाढ केवळ मारुती सुझुकीनेच केलीयं असे नाही कारण महेंद्रा कंपनीनेही आपल्या सर्व कारच्या किमती २.५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत., महिंद्रा ऑटोमोटिव्हनेही त्यांच्या कारच्या किमती १०,००० ते ६३,००० रुपयांनी वाढवल्या आहेत.

वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटसह या किंमती वाढवल्या आहेत. या किंमत वाढीचे कारण कंपनीने बाजारात स्टील, अॅल्युमिनियम, पॅलेडियम आणि इतर अनेक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.