देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी या कंपनीकडून यावर्षी अनेक कार लाँच करणार असल्याचे सांगण्यात आले होते. यातीलच एक म्हणजे कंपनीने Maruti XL6 ही कार भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने या कारमध्ये आणखी जबरदस्त फीचर्स समाविष्ट केले आहेत. या कारची किंमत कंपनीने सुरुवातीला ११.२९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

ही कार मोठ्या कुटुंबासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊया या कारच्या फीचर्स बाबत.

कारचे इंजिन

२०२२ मारुती XL6 मध्ये इंजिन नवीन १.५ -लीटर K१५C DualJet, ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०१.६ bhp पॉवर आणि १३६.८ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ -स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६ -स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकशी जोडलेले आहे.

कारमधील इंटीरियर व फीचर्स

फेसलिफ्टेड २०२२ Maruti Suzuki XL6 मध्ये जुन्या मॉडेलच्या तुलनेत काही डिझाइन बदल करण्यात आले आहेत. कारच्या बाजूला मशीन फिनिशिंगसह टू-टोन १६ -इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत. यासोबतच ब्लॅक फिनिशिंगमधील बी आणि सी पिलर, शार्क फिन अँटेना आणि क्रोम एलिमेंट्स बाजूला देण्यात आले आहेत.

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह ७ इंचाचा स्मार्ट प्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. येथे व्हॉईस असिस्टंटसाठी देखील समर्थन आहे. या नवीन कारमध्ये ४० हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

ग्राहक सुसंगत स्मार्टवॉच आणि अॅमेझॉन अलेक्सा असिस्टंटद्वारे कारशी दूरस्थपणे कनेक्ट होऊ शकतात. नवीन XL6 मध्ये ड्रायव्हर आणि समोरच्या प्रवाशासाठी वातानुकूलित सीट्स देखील बसवण्यात आली आहेत. यात छतावर एसी देखील बसवलेले आहेत.

कारची किंमत

Maruti Suzuki XL6 ची सुरुवातीची किंमत बाजारात ११.२९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.