मुंबई : बॉलिवूड कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अलीकडेच फॅशन डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये त्यांच्या कुटुंबासह दिसले. या पार्टीतील दोघांचे एकापेक्षा एक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत जे खूप व्हायरल झाले आहेत.

मलायका अरोराने या पार्टीतील तिच्या लूकचे ताजे फोटोही चाहत्यांसह शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या अभिनेत्रीचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

मलायकाने या खास प्रसंगी पांढरा रंग निवडला. मलाइकाने घेरदार लेहेंग्यावर त्याच रंगाची पांढरी चोली घातली होती. यासह मलायकाने न्यूड मेकअप केला होता, यासह तिने ज्वेलरी परिधान करून तिचा लुक पूर्ण केला. या पांढऱ्या रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. आणखी ग्लॅमरस दिसण्यासाठी मलायकाने तिचे केस खुले ठेवले होते. यासोबतच तिच्या हातात पांढर्‍या रंगाची छोटी पर्स होती.

मलायकाच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मलायकाला पाहून कोणीही तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. मलायका पहिल्यांदाच अशा लग्नात पोहोचली आहे असे नाही. मलायकाने याआधीही तिच्या लूकने धुमाकूळ घातला आहे.