नवी दिल्ली : अभिनेता अर्जुन कपूरचा (Arjun kapoor) वाढदिवस जवळ येत आहे. आता त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिने त्याच्यासाठी खास सरप्राईज प्लान केले आहे. अर्जुन कपूरने या सरप्राईजचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि एक नोटही लिहिली आहे. अभिनेता अर्जुन कपूरचा वाढदिवस 26 जूनला आहे. या निमित्ताने त्याला त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराने त्याला खास भेट दिली आहे.

गुरुवारी अर्जुन कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवर मलायकाच्या भेटवस्तूची एक झलक शेअर केली. 3 दिवसांनंतर अभिनेत्याचा वाढदिवस आहे. फोटो शेअर करताना अर्जुन कपूरने लिहिले की, “वाढदिवसाच्या 72 तास आधी ती तुम्हाला आठवण करून देते की हा तुमचा वाढदिवस वीकेंड आहे. फोटोंमध्ये दिसत आहे. मलायका अरोराने त्याला अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. सर्व भेटवस्तू ब्लॅक अँड व्हाइट कव्हर बॉक्समध्ये दिसत आहेत. यावेळी अर्जुन कपूरनेही आपला आनंद व्यक्त केला आहे.”

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी 2019 मध्ये त्यांचे नाते सार्वजनिक केले. अर्जुन कपूर 36 वर्षांचा आहे, तर मलायका त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.

मलायका अरोरासोबत लग्न करायचे आहे, असे अर्जुन कपूरने याआधी सांगितले होते. लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी मलायका अरोरा हिने अरबाज खानपासून घटस्फोट घेतला आहे. त्याला अरबाज खानपासून एक मुलगाही आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही जोडी खूप चांगली आहे. आणि चाहत्यांना देखील जी जोडी फार आवडते.

Leave a comment

Your email address will not be published.