मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासाठी एप्रिल महिन्याची सुरुवात खूपच वाईट होती. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २ एप्रिलला अभिनेत्रीचा कारचा अपघात झाला, ज्यामध्ये ती जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखलही करण्यात आले, पण चांगली गोष्ट म्हणजे या अपघातात अभिनेत्रीला फारशी दुखापत झाली नाही. आता अपघाताच्या 26 दिवसांनंतर, अभिनेत्रीने एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये चाहत्यांना तिच्या कपाळावर झालेली जखम बघायला मिळते आहे.
मलायका अरोराने 2 एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. पण आता दुखापतीतून सावरल्यानंतर अभिनेत्री पुन्हा कामावर परतली आहे. मलायका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. दुखापतीनंतर काही दिवसांनी तिने चाहत्यांना या अपघाताविषयी सांगितले, मात्र यावेळी दुखापत दाखवली नाही, आता अभिनेत्रीने एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची दुखापत स्पष्टपणे दिसत आहे.
अपघातानंतर मलायकाने कामातून ब्रेक घेतला आणि आता ती कामावर परतली आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या कपाळावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. मलायका आजपर्यंत नेहमीच तिची दुखापत लपवताना दिसली आहे. आता पहिल्यांदाच मलायकाने असा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या कपाळावरची जखम स्पष्टपणे दिसत आहे.
2 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील खोपोली येथे एक्सप्रेस वेवर अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात मलायकाला किरकोळ दुखापत झाली, त्यानंतर तिला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन वाहनांच्या धडकेने हा अपघात झाला. मलायकाची कार दोन वाहनांच्या मध्ये होती.