मुंबई : इंटरनेटच्या या जगात बॉलिवूडवर नेहमीच बारकाईने नजर असते, बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या लेट नाईट पार्टी असो की रिलेशनशिप या सर्व बातम्या अगदी आगी प्रमाणे सर्वत्र पसरतात. पण अशा बातम्यांमध्ये काहीवेळ सत्यता नसते, तर काहीवेळा या बातम्या खऱ्या देखील ठरतात. अशातच सर्वत्र अभिनेत्री मालयकाच्या प्रेग्नसीची बातमी जोर धरू लागली आहे.

अलीकडेच एका बातमीत अभिनेत्री मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याचे वृत्त होते. यावर अभिनेता आणि मालयकाचा प्रियकर अर्जुन कपूर चांगलाच संतापला. अर्जुन कपूरनंतर मलायकाही या न्यूज साइटवर संतापली आणि प्रतिक्रिया देत चांगचेच खडसावले आहे.

मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही बातमी ‘घृणास्पद’ असल्याचे म्हटले आहे. मलायकाने या फेक न्यूजसाठी… न्यूज साईट आणि रिपोर्टरला चांगलेच फटकारले आहे. मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीवर रिपोर्टरच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून आपला राग व्यक्त केला आहे.

मलायकाने तिच्या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “हे सर्वात खालच्या थराचे काम आहे जे तुम्ही केले आहे. असंवेदनशील राहून तुम्ही हे सहज लिहिलंय. ते अनैतिक आहे, कचरा आहे. असे खोटे गॉसिप लेख माध्यमांमध्ये पसरतात आणि मग खरे ठरतात, हे योग्य नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका.”

ही बातमी प्रसिद्ध झाली होती की अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या घरी गोड बातमी येणार आहे. तसेच हे कपल ऑक्टोबरमध्ये लंडनला गेले होते, जिथे मलायकाने तिच्या जवळच्या लोकांसोबत प्रेग्नेंसीची बातमी शेअर केली होती. या बातमीनंतर अर्जुन कपूरने लिहिले होते की, “तुम्ही आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिम्मत करू नका.’ आता मलायकानेही या वृत्तावर आपले म्हणणे मांडले आहे.”

मलायका आणि अर्जुन 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. यापूर्वी मलायकाचे लग्न अरबाज खानसोबत झाले होते आणि दोघांना एक मुलगा आहे.