सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम घरात बनवलेल्या अन्नपदार्थांवर दिसून येतो. उष्णतेमुळे बऱ्याचदा हे अन्नपदार्थ खराब होत असतात. असेच दुधाच्या बाबतीतही होत असते. दूध गरम करतानाच नासते. मग हे दूध आपण लगेच फेकून देतो.
जर तुम्हीसुद्धा फुटलेले दूध फेकून देत असाल तर, असे करू नका. कारण हेच दूध वापरून आपण त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. ज्याने त्या पदार्थांची चवही वाढेल.चला तर मग जाणून घेऊया फुटलेल्या दुधाचा कशाप्रकारे उपयोग करता येईल.
फुटलेल्या दुधापासून पनीर बनवा. जे खूप चवदार असेल. फक्त कापसाच्या कापडात फुटलेल्या दूध गुंडाळा आणि त्यावर जड वस्तू ठेवा. असे केल्याने दुधाचे पाणी पूर्णपणे बाष्पीभवन होऊन पनीरला छान आकार मिळेल.
जर तुम्हाला सूप प्यायला आवडत असेल तर फुटलेले दूध सूपमध्ये टाका. असे केल्याने सूपची चव दुप्पट होईल आणि ते फायदेशीर देखील होईल.
तसेच आपण फुटलेल्या दुधात दही घालून दही बनवू शकता. यानंतर याच दह्यापासून ताक बनवा आणि हिंग जिरे कुटून उन्हाळ्यात पिऊ शकता.
फुटलेले दूध केकच्या पिठात घालून शिजवले तर ते खूप चविष्ट बनते. फुटलेले दूध केकमध्ये बेकिंग सोडा म्हणून काम करते आणि केक खराब होण्यापासून रोखते. त्याच वेळी, फुटलेले दुधाचे दही देखील खूप चवदार बनते. हे दही तुम्ही भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये किंवा करीमध्ये वापरू शकता.