महाअपडेट टीम, 1 फेब्रुवारी 2022 : शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार यांनी संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.गणेश महाराज वाघमारे (ओझर) यांची बाभूळसर खुर्द, शिरुर येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार अशोकबापू पवार यांच्यासह, बाभूळसर खुर्दचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी आ. अशोकबापू पवार यांनी ह.भ.प.गणेश महाराज वाघमारे यांचा सत्कार केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या पावन भूमीला संतांचा पवित्र वारसा लाभला आहे.
व्यक्तीबरोबरच कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी संतांनी दिलेली शिकवण आजही प्रेरणादायी ठरते. हा पवित्र वारसा जतन करून पुढील पिढीकडे सुपूर्द करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.