महाअपडेट टीम, 8 फेब्रुवारी 2022 : शिरूर तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार अन् त्यांच्या पत्नी मा. सभापती सुजाता अशोकबापू पवार यांच्या संकल्पनेने प्रतिवर्षी प्रमाणे 7/2/2022 घेण्यात येणारा हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम स्व. लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे पुढे ढकलण्यात आला होता.
परंतु, आता आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, हा कार्यक्रम आता उद्या 9 फेब्रुवारी 2022 रोजी पंचायत वाडा शिरूर या ठिकाणी घेण्याचा ठरवला आहे. तरी समस्त महिलांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ठीक संध्याकाळी 4:00 वाजता या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.
दिनांक: – 9 फेब्रुवारी 2022
वेळ :- संध्याकाळी 4:00 वाजता
स्थळ :- पंचायत वाडा, शिरूर
टिप :- कार्यक्रमाला येताना कोरोनाचे नियम पळून सर्वांनी मास्कचा वापर करावा.
आपले नम्र :-
श्री. अशोकबापू पवार
आमदार शिरूर – हवेली विभानसभा
अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती
संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
सौ. सुजाताभाभी अशोकबापू पवार,
माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन विभाग, पुणे जिल्हा परिषद सदस्या.