महाअपडेट टीम : जवळजवळ सर्व स्मार्टफोन्स हळूहळू लॅपटॉप सेगमें मध्ये आपली एंट्री करून त्यांचा पोर्टफोलिओ मजबूत करत आहेत. स्मार्टफोन प्रमाणे आता Realme -Xiaomi ने लॅपटॉप मार्केट मध्ये आणले आहेत. परंतु आता Oppo आणि Nokia लॅपटॉपही लवकरच मार्केटमध्ये आणणार असून आता Poco नेही लॅपटॉप मार्केटमध्ये आणण्याचा प्लॅन केला आहे.

परंतु लेटेस्ट डेवलपमेंट, Redmi G सीरीज़ चा लॅपटॉप बॅटरीला भारतीय मानक ब्युरो (BIS) कडून पोको ब्रांडिंग (Poco) ब्रँडिंगसह प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे रिपोर्टनुसार समजलं आहे. यावरून असे सूचित होते की, चीनी ब्रँड Poco आपला लॅपटॉप भारतात अधिकृतपणे लॉंच करण्याचा विचार करत आहे. परंतु हे Poco लेबलसह फक्त Redmi G-सीरीज मॉडेल असू शकतं. गेल्या वर्षी Xiaomi पासून वेगळ्या झालेल्या या ब्रँडने त्याचे नवीन ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरबड्स आणि स्मार्टवॉच लॉंच केलं होतं.

रेडमी G सीरीज लॅपटॉप बॅटरीला Poco लेबलसह केलं लिस्ट :-

91Mobiles ने टिपस्टर मुकुल शर्मा यांच्या सहकार्याने अहवाल दिला की, BIS वेबसाइट वर G16B01W बिल्ड नंबरसह Redmi G सीरीज लॅपटॉप बॅटरी लिस्ट केली गेली आहे.आधी सांगितल्याप्रमाणे, ते Poco ब्रँडिंगसह लेबल केलेलं आहे. हे असं संकेत देतंय की Poco भारतात ‘रीब्रँडेड’ Redmi G लॅपटॉप लॉंच करण्याचा विचार करू शकतं.

बॅटरी पॉवर किती असू शकते :-

G16B01W बॅटरी अलीबाबाच्या AliExpress या ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही 16.1-इंच रेडमी जी गेमिंग लॅपटॉपसाठी आहे आणि त्याची क्षमता 3620mAh आहे.

भारतात Poco लॅपटॉप लाँच करण्याचा इशारा देण्यासाठी BIS साइटवर बॅटरीची सूची येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, पोको ब्रँडिंगसह दोन लॅपटॉप बॅटरी मॉडेल R15B02W आणि R14B02W सर्टिफिकेशन पोर्टलवर दिसले. हे बॅटरी मॉडेल Mi नोटबुक मॉडेलशी संबंधित होतं.

Leave a comment

Your email address will not be published.