महाअपडेट टीम : पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे महागाईच्या रुपाने सर्वसामन्यांवर खिशाला झळ बसत आहे. आता लोकांचं बजेट बसवण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वळल्याचं पाहायला मिळत आहे.

यामुळेच ऑटोमेकर्स त्यांचे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात उतरवणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत सर्वाधिक मागणी दुचाकी वाहनांमध्ये दिसून येत आहे. गुजरात आधारित EV स्टार्टअप ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटर्सने भारतीय बाजारपेठेत नवीन चार इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या आहेत.

किंमत :-

इवेस्पा, हार्पर, ग्लाइड आणि हार्पर झेडएक्स या नवीन स्कूटर्सची नावे आहेत. ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या नवीन श्रेणीतील ई-स्कूटर्सच्या एक्स-शोरूम किमती रु. 60,000 ते रु. 92,000 हजार या दरम्यान आहेत.

4 बॅटरी ऑप्शन :-

कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कूटरची नवीन रेंज बेस्ट-इन-क्लास आराम आणि दमदार परफॉर्मन्स देते. निर्मात्याच्या मते, ग्रेटाच्या या इलेक्ट्रिक स्कूटर चार बॅटरी ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत. V2 (Lithium+48V), V2+ (Lithium+60V), V3 (Lithium+48V), आणि V3+ (Lithium+60V) या चार बॅटरी ऑप्शन पैकी ग्राहक कोणतीही बॅटरी निवडू शकतात.

फक्त 4 चं तासांत होणार चार्ज :-

कंपनीचं असं म्हणणं आहे की, या स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किमीपर्यंतचे अंतर सहज कापू शकतात. ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटर्सचा असा दावा आहे की, ई-स्कूटरची बॅटरी 0 ते 100 % पर्यंत पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तासांचा कालावधी लागतो.

लुक आणि डिजाइन :-

ग्रेटाने लॉन्च केलेल्या चार स्कूटर – हार्पर, हार्पर ZX, इवेस्पा आणि ग्लाइड, प्रत्येकाची बॉडी स्टाइल एकमेकांपासून काहीशी वेगळी आहे. हार्पर आणि हार्पर ZX समोर ऍप्रन, शार्प बॉडी पॅनेल्स आणि स्लीक टर्न सिग्नल्ससह स्पोर्टी लुकमध्ये आहेत. हार्परला ड्युअल हेडलॅम्प युनिट मिळते, तर हार्पर ZX ला सिंगल हेडलॅम्प मिळतो.

फीचर्स आणि कलर :-

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये DRL, EBS, रिव्हर्स मोड, ATA सिस्टम, स्मार्ट शिफ्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म यासारख्या फीचर्स चा समावेश आहे. कंपनी ड्रम आणि डिस्क ब्रेक या ऑप्शनसह उपलब्ध आहे . ग्रेटा हार्पर, इवेस्पा आणि हार्पर ZX मॉडेल्सना ड्रम डिस्क ब्रेक मिळतात, तर ग्लाइडला ड्युअल डिस्क हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम मिळते. ई-स्कूटर 22 रंगांच्या ऑप्शनसह उपलब्ध आहे.

Leave a comment

Your email address will not be published.