महाअपडेट टीम : उपनिवेशवादी विचारसरणी असलेल्या काही बाह्य आणि अंतर्गत शक्ती भारतासारख्या विकसनशील देशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या भाषणात म्हटलं.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, पॅरिस कराराची उद्दिष्टे वेळेपूर्वी साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणारा भारत हा एकमेव देश आहे. असे असतानाही पर्यावरणाच्या नावाखाली भारतावर विविध दबाव निर्माण केले जातं आहे. हे सर्व उपनिवेशवादी (वसाहतवादी) मानसिकतेचा परिणाम आहे.

ते म्हणाले की, भारतातही काही लोक वसाहतवादी मानसिकतेचे असून जे काहीवेळा कोणत्याही मुद्द्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देशाच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

आपल्याच देशातही काही लोकांच्या याच मानसिकतेमुळे विकासामध्ये बाधा आणण्याचं काम होतंय. कधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, तर कधी दुस-या गोष्टी अवलंबून ते साध्य करताना दिसून येतात.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आमचं सरकार ”सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास – सबका प्रयास” या मूळ मंत्रावर काम करत आहे. जे संविधानाच्या आत्म्याचे सर्वात शक्तिशाली प्रकटीकरण आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर जगातील वसाहती संपुष्टात आल्या, परंतु वसाहतवादी मानसिकता अजूनही कायम आहे, ज्या मार्गावर पाश्चिमात्य देशांचा विकास झाला, तो मार्ग भारतासारख्या विकसनशील देशांसाठी वेगवेगळ्या नावाने बंद केला जात आहे.

आपण तर दगडांना झाडांनाही देव मानतो :-

पंतप्रधान म्हणाले की, 1857 पासून पाश्चात्य देशांनी भारताच्या 15 पट कार्बन उत्सर्जन केले आहे. अमेरिकेचे दरडोई परिपूर्ण कार्बन उत्सर्जन 20 पट जास्त आहे. ते म्हणाले की, भारत ही निसर्गासोबत जगण्याची प्रवृत्ती असलेली संस्कृती आहे.

येथे झाडे आणि दगडांची देवता म्हणून पूजा केली जाते. भारतात वनक्षेत्र वाढत आहे. सिंह आणि डॉल्फिनची संख्याही वाढली आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात देश आघाडीवर आहे. भारताने स्वतःहून वाहनांचे प्रदूषण मानके कडक केली आहेत. तरीही भारताला पर्यावरणावर सुनावलं जात आहे.

अमेरिका आणि युरोपने 1850 पासून भारताच्या तुलनेत दरडोई 20 पट प्रदूषण करून विकासाचा मार्ग प्रस्थापित केला आहे, परंतु आता भारतासारख्या निसर्गप्रेमी देश आणि समाजाला पर्यावरण रक्षणाचा उपदेश दिला जात आहे.

मोदींनी दिलं नर्मदा नदीचं उदाहरण :-

नर्मदा धरणाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, भारतातही काही शक्ती विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. नर्मदेच्या पाण्याच्या आगमनामुळे आज गुजरातचा वाळवंटी जिल्हा कृषी उत्पादनांच्या निर्यातीत जगात ठसा उमटवत आहे. हे तेच आहे, जे एकेकाळी लोकांच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध होतं.

पायाभूत सुविधांच्या योजनांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांमुळे वीज, रस्ते जोडणी आणि इतर सुविधांच्या अभावी राहणाऱ्या माता, वडील आणि त्यांच्या मुलांना हे नुकसान सहन करावं लागतं आहे.

संविधानाच्या पोटातूनच शासन आणि न्यायव्यवस्थेचा जन्म :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, सरकार आणि न्यायव्यवस्था या दोन्हींचा जन्म संविधानाच्या पोटातून झाला आहे, त्यामुळे दोघेही जुळे असून हे सगळं संविधानामुळेच अस्तित्वात आलं आहे.

त्यामुळे, व्यापक दृष्टीकोनातून, भिन्न असूनही, दोघेही एकमेकांना पूरक आहेत. स्वातंत्र्य चळवळीत निर्माण झालेली दृढनिश्चय शक्ती अधिक बळकट करण्यात वसाहतवादी विचार हा मोठा अडथळा असल्याचे ते म्हणाले. आपल्याला यावर मात करायची आहे आणि त्यासाठी आपली सर्वात मोठी शक्ती, आपली सर्वात मोठी प्रेरणा, आपले संविधान आहे.

आपलं सरकार हे कुठलाही भेदभाव न करता संपूर्ण देशाच्या हितासाठी काम करत आहे. भारतातील लोक आज जे काही मिळवत आहेत त्यापेक्षा अधिक पात्र आहेत. सर्वांना सोबत घेऊन काम करूनच हे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. यात न्यायपालिकेची सर्वात मोठी भूमिका असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Leave a comment

Your email address will not be published.