महाअपडेट टीम : हिंदू धर्मात लग्नापूर्वी कुंडली जुळवली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार लग्नापूर्वी कुंडली जुळवणे खूप महत्वाचं असतं. कुंडली जुळल्यानंतरच नाते पक्के होते. कुंडली जुळल्याने नातेसंबंध दीर्घकाळ टिकतात आणि विवाह दीर्घकाळ टिकतो असं मानलं जातं. आजच्या काळात मेडिकल कुंडली जुळणं हे गुणांपेक्षा महत्त्वाचे आहे. लग्नापूर्वी मेडिकल कुंडली जुळवणे का आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

मेडिकल कुंडली म्हणजे नेमकं काय ?

मेडिकल कुंडली ही लग्नापूर्वीच करावी. या कुंडलीमध्ये मेडिकल रिपोर्ट, रोगांशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळते. लग्नाच्या काळात अनेक वेळा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही आजाराविषयी बोलत नाही, पण लग्नानंतर असे रहस्य बाहेर येऊ लागतात. त्यामुळे नवीन जोडप्याचं नातं बिघडतं, काहीवेळा हे रहस्य बाहेर पडल्याने नाते तुटतं .त्यामुळे लग्नापूर्वी मेडिकल कुंडली जुळणे आवश्यक आहे.

लग्नापूर्वीच मेडिकल करणं का आहे गरजेचं :-

लग्नापूर्वी मेडिकल तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण लग्नापूर्वी अशी गोष्ट लपवून कोणत्याही कुटुंबाच्या व व्यक्तीच्या भविष्याशी खेळू नये. लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी दोघांची मेडिकल टेस्ट करणं आवश्यक आहे. लग्नापूर्वी ही टेस्ट जरूर करून घ्यावी.

ब्लड टेस्ट
प्रजनन क्षमता
लैंगिक संक्रमित संसर्गासाठी स्क्रीनिंग
जेनेटिक टेस्ट
कोणत्याही आजाराची आणि औषधांबद्दल माहिती देणे

लग्न हे एक दीर्घकालीन चालणार नातं आहे, लग्नानंतर नवीन कुटुंब मिळतं, अशा परिस्थितीत जितकं सत्य तुम्ही लग्नाआधीच सांगाल तितकंचं तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होईल.

या गोष्टी लक्षात ठेवा :-

जर नाते जास्त काळ टिकवायचं असेल तर लग्नापूर्वी काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. नातेसंबंध जोडण्यापूर्वी, मेडिकल टेस्ट स्पष्ट असणे आवश्यक आहे जेणेकरून आगामी काळात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये. मेडिकल टेस्ट व्यतिरिक्त, या गोष्टींची स्पष्टता देखील आवश्यक आहे.

मुलीने व मुलाने त्यांच्या शिक्षणाबाबत खरे सांगावे.
मुलगा आणि मुलगीने त्यांच्या नोकरीबाबत स्पष्ट असलं पाहिजे.
मुलगा आणि मुलीने आपापली आर्थिक परिस्थिती स्पष्ट करायला हवी.

Leave a comment

Your email address will not be published.