महाअपडेट टीम : फिट (अपस्मार, एपिलेप्सी) हा एक गंभीर प्रकारचा रोग आहे जो प्रौढांसह लहान मुलांमध्येही आढळून येत आहे. प्रत्येक 200 मुलांपैकी एका मुलामध्ये ही लक्षणे जाणवतात. अपस्मार म्हणजे फिट येणे हा मेंदूचा आजार आहे. आणि त्यामुळे पीडितेला अधून – मधून झटके येतात. मेंदू हा इलेक्ट्रिकल नेटवर्कने बनलेला असतो. त्यात लाखो नेटवर्क आहेत आणि त्यांच्या जोरावर संपूर्ण शरीर आपले काम करतं. काही वेळा या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये काही बिघाड झाला की, मेंदूचा समतोल बिघडतो. त्यामुळे त्या व्यक्तीला मेंदूचा झटका येतो. पण प्रत्येक झटक्याला एपिलेप्टिक सीझर ( फिट येणं) म्हणता येणार नाही. लहान मुलामध्ये असा प्रसंग वारंवार येतो आणि अचानक होतो तेव्हा त्याला एपिलेप्सी म्हणतात.

मुलांमध्ये एपिलेप्सीची ( फिट येणं) लक्षणे :-

स्नायू कडक होणे.
स्नायूंना अचानक झटके बसणे.
क्रॅम्पिंग
स्नायू मुरडणे
मूत्राशय आणि टॉयलेट करण्यावर नियंत्र नसणे.
बोलण्यात अडचण.
टाळ्या वाजवणे किंवा हात चोळणे यासारखी क्रिया वारंवार करणे.

मुलांमध्ये एपिलेप्सीची कारणे :-

काही मुलांना अपस्माराची ( फिट येणं) अनुवांशिक समस्या असते. यामध्ये जीन्स चा मेंदूवर कसा परिणाम होतो आणि त्यामुळे अपस्मार कसा होतो, याचा शोध अद्याप घेण्यात आलेला नाही. डोक्याला दुखापत झाल्यानंतरही मुलांना सतत झटके येतात. ताप, ब्रेन ट्यूमर, इन्फेक्शन इत्यादी विशेष परिस्थितीमुळे मेंदूला होणारे नुकसान. एंजेलमन्स सिंड्रोम, न्यूरोफिब्रोमेटोसिस, डाउन सिंड्रोम आणि ट्यूबरस स्क्लेरोसिस यांसारख्या हळूहळू प्रगती होत असलेल्या समस्या असलेल्या मुलांना देखील अपस्मार होण्याची शक्यता बळावते.

हा रोग कोणत्याही वयात होऊ शकतो :-

अपस्मार कोणत्याही वयात होऊ शकतो. यासाठी वयाचं कोणतंही बंधन नाही. अपस्माराची (फिट ) लक्षणे बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवशीही नवजात मुलामध्ये दिसू शकतात. म्हातारपणातही अनेकांना अपस्माराची लक्षणे आढळतात. अपस्माराचा आजार याच वेळी सुरू होतो, असेही गरजेचे नाही, तांत्रिकदृष्ट्या समजले तर, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात अपस्माराची (फिट ) लक्षणे दिसू शकतात.

स्वतःचा बचाव कसा कराल ? :-

मुलाला पुरेशी झोप घेऊ द्या, कारण झोपेची कमतरता हे मुलांमध्ये फेपरे येण्याचं कारण आहे. डोक्याला दुखापत होण्यापासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी, स्कॅटिंग किंवा सायकलिंग करताना त्याच्या डोक्यावर हेल्मेट घाला. तुमच्या मुलाला दररोज एकाच वेळी एपिलेप्सी कमी करण्याचं औषधे देण्यास विसरू नका. मुलांना पडण्यापासून वाचवण्यासाठी काळजीपूर्वक चालण्यास सांगा. मुलाला जास्त प्रकाशात किंवा गोंगाटाच्या ठिकाणी नेऊ नका, कारण यामुळे कधीकधी फेफरे येण्याची शक्यता असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *