महाअपडेट टीम : आपल्या शरीराच्या अनेक भागांवर तीळ असतात, काहींच्या चेहऱ्यावर तीळ तर काहींच्या हातावर तर काहींच्या पायावर तीळ असतं.तसं पाहिलं गेलं तर शरीरावरील तिळाबद्दल अनेक समजुती आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
महिलांच्या उजव्या अंगावर दिसणारे तीळ खूप शुभ असतात असे म्हटलं जातं. हे त्यांच्या नशिबाशी संबंधित आहेत. काही हर्टस जन्मत:च आपल्या शरीरावरअसतात, तर काही कालांतराने आपल्या शरीरावर आढळतात. महिलांच्या शरीराच्या काही भागांवर आढळणाऱ्या तीळांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
1. जर एखाद्या महिलेच्या ओठावर तीळ असेल तर पुरुष अशा महिलांशी लवकर आकर्षित होतात. त्या महिलांचे अनेक चाहते असतात. पण याशिवाय अशा महिलांकडे पैसे टिकत नसल्यामुळे त्यांना आर्थिक तंगी ला सामोरे जावे लागतं.
2. वरच्या ओठावर तीळ असलेलया महिला आणि पुरुष दोघेही पैशाच्या बाबतीत कंजूस मानले जातात. जर वरच्या ओठावर डाव्या बाजूला तीळ असेल तर अशा महिला आपल्या मुलांशी खूप संलग्न असतात.
3. डाव्या डोळ्यावर तीळ असलेल्या महिलांना खूप अहंकारी मानलं जातं.
4. भुवयांच्या मध्ये तीळ असणे म्हणजे तुम्ही सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. अशा लोकांना खूप बुद्धिमान देखील मानलं जातं.
5. जर एखाद्या स्त्रीच्या कपाळावर तीळ असेल तर ती खूप महत्वाकांक्षी आणि आत्मविश्वासी असते. अशा महिलांमध्ये काहीतरी करण्याची तळमळ, जिज्ञासा आणि त्या प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बळावर करायची तयारी ठेवतात.
6. ज्या स्त्रीच्या नाकाखाली तीळ असतो त्यांना आयुष्यात खूप आनंद मिळतो. नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असणं देखील शुभ मानलं जातं.
7. महिलांच्या कंबरेवर तीळ असणे म्हणजे त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो. अशा महिला शिक्षण क्षेत्रातही मोठं यश संपादन करतात.
8. कंबरेवर तीळ असलेल्या महिला खूप रोमँटिक मानल्या जातात.
9. महिलांच्या बेंबीखाली तीळ असेल तर त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
10. जर एखाद्या महिलेच्या पायावर तीळ असेल तर ती खूप फिरण्यासाठी शौकीन मानली जाते. उजव्या पायाच्या टाचेवर तीळ असल्यास परदेश प्रवास करण्याची संधीही त्यांना मिळते.