महाअपडेट टीम : केसांची निगा राखण्यासाठी केसांना तेल लावावं असं म्हटलं जातं. केसांना तेलाने मसाज केल्याने केस चमकदार आणि दाट राहतात. विशेषत: हिवाळ्यात केसांना अवश्य मसाज करावा. हिवाळ्यात केसांमध्ये कोरडेपणा आणि कोंडा इत्यादी समस्या अधिक असतात, त्यामुळे केसांना पोषण देण्यासाठी तेल मसाज करणं सर्वोत्तम मानलं जातं. हिवाळ्यात केसांसाठी मोहरीचं तेल खूप फायदेशीर ठरतं.
केसांची निगा राखण्यासाठी केसांना योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी तेल लावणे अत्यंत आवश्यक आहे. महिला अनेकदा रात्री केसांना तेल लावतात आणि दुसऱ्या दिवशी केस धुतात, तर काही महिला आंघोळीच्या 15 मिनिटे आधी केसांना तेल लावतात. केसांना तेल कधी लावायचं अन् कधी लावायचं नाही ? याबाबत महिला बराच गोंधळ घालतात. केसांना तेल कधी आणि कसं लावायचं ते जाणून घेऊया….
केस धुण्याच्या 10 मिनिट आधी केसांना करा मसाज :-
केसांमध्ये सतत तेल ठेवू नये. तेल जास्त वेळ केसांमध्ये ठेवल्यास केसांमध्ये घाण अधिक चिकटते. 12 तासांपेक्षा जास्त वेळ केसांना तेल लावल्याने कोंडाही खूप वाढतो. अशावेळी केस धुण्यापूर्वी 10 ते 30 मिनिटे केसांना मसाज करा. यामुळे केसांचे पोषण होते आणि केस तुटत नाहीत. केसांना मसाज करताना बोटांचा वापर करा, यामुळे रक्ताभिसरणही वाढेल.
केसांसाठी मोहरीच्या तेलाचे फायदे:-
हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी मोहरीच्या तेलाने मसाज करा. मोहरीच्या तेलात अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात, जे केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. केस धुण्याच्या 10 मिनिटे आधी मोहरीच्या तेलाने केसांना मसाज करा. मोहरीच्या तेलाने मसाज केल्यावर केस चमकदार आणि मऊ होतील. मोहरीचे तेल लावल्याने केस पांढरे होणेही कमी होते.
केसांना कोमट तेलाने करा मसाज :-
केसांच्या मसाजसाठी कोमट तेल पौष्टीक मानलं जातं.
मोहरीचे तेल हलके गरम करा.
त्यानंतर केसांना कोमट तेल लावा.
केसांना हलक्या हाताने मसाज करा.
मसाज करताना हाताचे तळवे वापरू नका, यामुळे केस कमजोर होतात.
केसांना मसाज करण्यासाठी बोटांचा वापर करा.
कोमट तेलाने केसांना मसाज केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते.