महाअपडेट टीम : तुम्हाला तर माहितच आहे चहा आपल्याया भारतात किती लोकप्रिय ड्रिंक आहे, त्यामुळे चहा हे भारतातील सर्वात लोकप्रिय ड्रिंक मानले गेले आहे. बहुतेक भारतीय त्यांच्या दिवसाची सुरुवात एक कप गरम चहाने करतात. बरेच लोक चहा साठी इतके वेडे असतात की ते दिवसातून 4 ते 5 कप चहा पितात. परंतु ते आरोग्यासाठी खुपचं हानिकारक ठरू शकतं, कारण त्यात मोठ्या प्रमाणात साखर असल्याने अनेक रोग उदभवू शकतात.
अशा परिस्थितीत,आजकाल बरेच लोक आता साखरेच्या चहाला वेगळा पर्याय शोधत आहे. जेणेकरून त्यांना चहाचा आनंदही घेता येईल आणि साखरेचं प्रमाणही कमी करता येईल. जर तुम्हीही चहा पिण्याचे शौकीन असाल आणि या सवयीवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुम्ही गुळाच्या चहाचे सेवन नक्कीच करू शकता…
गुळाचा चहा हा चहाचा असा लोकप्रिय पर्याय बनत आहे, जो तुमच्या आरोग्यासाठी वरदानचं ठरतोय. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो तुमच्या चहाची लालसाही कमी करू शकतो. जो वजन नियंत्रण ठेवण्यातही उपयुक्त ठरू शकतो.
चला तर मग पटकन जाणून घेऊया गुळाच्या चहाची रेसिपी :-
गुळाचा चहा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य :-
3-4 चमचे किसलेला गूळ
1 चमचा चहा पावडर
हिरव्या रंगाच्या 4 इलायची
1 चमचा बडीशेप
चिमूटभर काळ्या मिरीची पावडर किंवा ठेचलेली काळी मिरी
1/2 कप गूळ
गुळाचा चहा कसा बनवाल ?
नॉन-स्टिक पॅनमध्ये 1 कप पाणी आणि गूळ उकळवून घ्या, गूळ पूर्णपणे वितळे पर्यंत ढवळत रहा…
त्यांनतर त्यात इलायची ,बडीशेप, ठेचलेली काळी मिरी आणि चहाची पावडर घालून उकळी आणा.
तुम्हाला दूध टाकायचं असेल तर उकळीत दूध टाकू नका, गॅस वरून उतरवल्यानंतर 2 ते 3 मिनटांनंतर गरम हलकं दूध टाका.
पोषण :-
कॅलरी : 197 किलो कॅलरी
कार्बोहाइड्रेट: 34.8 ग्रॅम
प्रोटिन्स : 4.1 ग्रॅम
फॅट : 4.6 ग्रॅम
कॅलरी : 197 किलो कॅलरी
कॅल्शियम – 179 मि.ग्रॅम
आता जाणून घ्या गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे :-
1. वजन नियंत्रित ठेवते :-
गुळाचे सेवन कमी प्रमाणात केल्यास वजनावर नियंत्रिण ठेवता येतं. गुळाच्या चहाचा एक फायदा असा आहे की, तो हेल्दी मेटाबोलिजम वाढवतो.ज्यामुळे अन्न सहज पचतं. गुळाच्या सेवनाने पोटाभोवती असलेला घेर कमी करून वजन कमी करण्यास मदत करतो
2. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते :-
गुळामध्ये मॅग्नेशियम,आयरन, पोटॅशियम आणि फॉस्फरससह आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे हिवाळ्यात गुळाच्या चहाचा एक फायदा म्हणजे हिवाळ्यात तो उष्णता निर्माण करतो आणि शरीराला ऊब देतो. गूळ हाडे आणि सांधे मजबूत करतो.
3. खोकला, सर्दी आणि अँलर्जीपासून आराम :-
खोकला आणि सर्दीची लक्षणे दूर करण्यासाठी गुळाचा चहा हा लोकप्रिय घरगुती उपाय आहे. गूळ नैसर्गिकरित्या शरीराला गरम करतो आणि कमी प्रमाणात सेवन केल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. खोकला आणि सर्दी असलेल्यांनी नैसर्गिकरित्या बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी गुळाचा चहा प्यावा.