महाअपडेट टीम : हिवाळा हंगाम सुरु झाला असून सध्या सगळीकडं थंडीची चाहूल लागली आहे. अशा परिस्थितीत तुमच्या आरोग्याची एक्स्ट्रा काळजी घेणं खूप महत्वाचं बनलं आहे.तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करून हिवाळ्यातील होणाऱ्या समस्यांपासून नक्कीच आराम मिळवू शकता. हिवाळ्यात खोकला, सर्दी, ताप येणं खूपचं सामान्य बाब आहे. पण काळजी करू नका, कारण या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी आम्ही अशी रेसिपी घेऊन आलो आहे. जी आरोग्यदायी आणि खूप चवदारही आहे !
तरं जाणूनचं घ्यायचं असेल तर तो म्हणजे तुमचा आवडता ‘आवळ्याचा मुरंबा’ ; आवळ्याचा मुरंबा आरोग्यासाठी खूपचं फायदेशीर मानला जातो. अनेक तज्ञ लोक हिवाळ्यात तो खाण्याचाही सल्ला देतात.
चला तर मग जाणून घेऊया त्याची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी –
आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य :-
1) मोठ्या आकाराचे 7 आवळे
2) 300 ग्रॅम 1.25 कप किसलेला गूळ
3) 1 – लिंबू
आवळा मुरंबा कसा बनवाल ?
1) सर्व प्रथम, आवळा धुवा आणि उन्हात वाळू घालवा.
2) आता एका भांड्यात 2 कप पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी लवकर उकळावे म्हणून त्यावर झाकन ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात आवळा घाला. झाकण ठेवून 8 मिनिटे शिजू द्या, फ्लेम मध्यमच ठेवा.
3) गॅस बंद करा, आवळा उकळल्यानंतर मऊ होईल. मग आवळा पटकन थंड होण्यासाठी प्लेटमध्ये ठेवा. आवळा थंड होताच, त्याचे छोटे छोटे छिद्र करा. एअर टाईट कन्टेनर मध्ये भरून ठेवा.
4) नंतर त्या आवळा ठेवलेल्या कन्टेनरमध्ये गूळ टाका आणि झाकण बंद करा, गूळ वितळून पाक तयार होईपर्यंत 2 दिवस उन्हात किंवा खोलीत ठेवा.
5) 2 दिवसांनी गूळ वितळेल, तो घट्ट होण्यासाठी कढईत आवळा टाका आणि शिजू द्या. थोड्या वेळाने गॅस बंद करा. गुळाचा पाक घट्ट होईपर्यंत 5 मिनिटे शिजवा.
6) गॅस बंद करा, आता तुमचा मुरंबा तयार आहे, थंड होऊ द्या. मुरंबा थंड होताच. त्यात एका लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता तुम्ही मुरंब्याचे सेवन करू शकता…
आवळ्याचा मुरंबा खाण्याचे फायदे :-
पोषक तत्वांनी समृद्ध :-
आवळा क्रोमियम, झिंक, कॉपर, आयरन आणि इतर खनिज समृद्ध आहे.आयुर्वेदिक तज्ज्ञ शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही मिनरल्स महत्त्वाची मानतात.आवळ्यामध्ये हृदयविकाराचा धोका कमी करण्याची ताकद आहे.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर :-
आपले पोट निरोगी ठेवणे खूपचं महत्वाचं आहे, कारण बहुतेक आजार हे पोट खराब झाल्यामुळे होतात. त्यामुळे डॉक्टर फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचन आणि गॅस्ट्रिक समस्यांसाठी आवळ्याचा मुरंबा खाण्याचा सल्ला देतात.
वेदनांपासून आराम :-
सुजलेल्या सांध्यांवर आवळा हा एक आयुर्वेदिक उपाय मानला जातो. आवळा हा गुडघे किंवा सांधेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतो कारण तो व्हिटॅमिन-सी चा चांगला स्रोत आहे. या साठी आवळ्याचं सेवन शक्यतो सकाळी कच्चा किंवा मुरंबा स्वरूपात दिवसातून दोनदा करावं.
केस दाट आणि मजबूत बनवते :-
बरेच लोक केसांना आवळा तेल किंवा आवळ्याचा रस लावतात. पण आवळा मुरंबा खाल्ल्याने तुमचे केस दाट, मऊ आणि मजबूत होतात. आवळ्यामध्ये आयरन चे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते केसांसाठीही फायदेशीर ठरते.
त्वचेसाठी ठरतं फायदेशीर :-
आवळा मुरब्बा तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणू शकतो. कारण त्यात व्हिटॅमिन-सी चे चांगले स्रोत असते, जे त्वचेतील घाण काढून टाकते.
रोगप्रतिकार शक्ती वाढवते :-
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमणात आढळतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अँटिऑक्सिडंट्सचे भांडार असण्याव्यतिरिक्त, आवळा सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहे जो इम्युनिटी बूस्टर आहे.