महाअपडेट टीम : झणझणीत जेवण तसेच चव वाढवण्यासाठी मिरची शिवाय पर्याय नसतो. भारतातील काही लोकांना हिरवी मिरची कच्ची खाण्यास आवडतात. मसालेदार आणि तिखट जेवणाचे शौकीन चवीनुसार हिरव्या मिरचीचे सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का ? हिरवी मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत.कारण हिरव्या मिरचीच्या नियंत्रित सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता…

हिवाळा आता सुरू झाला आहे, आणि या दिवसात अनेक आजारही डोके वर काढतात. जर आपण काही खबरदारी घेतली तर आपण त्यांना बळी पडणे टाळू शकतो. तसेच, हिरवी मिरची हे असेच एक सुपरफूड आहे जे तुम्हाला या सर्व आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतं. यासोबतच वजन कमी करण्यापासून ते रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यापर्यंत ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं…

हिरवी मिरची आहे पोषक तत्वांचा खजिना :-

हेल्दी राहण्यासाठी अत्यावश्यक असलेले अनेक पोषक तत्वे हिरव्या मिरचीत आढळतात. तुमच्या रोजच्या आहारात आयरन, कॉपर, पोटॅशियम, प्रोटिन्स आणि कार्बोहाइड्रेट असायला हवं. अन् तुम्ही यासोबतच हिरव्या मिरचीचे सेवन केले तर बीटा कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन-झेक्सॅन्थिन अर्क पौष्टिक घटक तुमच्या शरीराला मिळू शकतात.

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढवते आणि यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो.

हिरव्या मिरचीचा आपल्या लाळ ग्रंथींवर परिणाम होतो, त्यामुळे आपलं रक्ताभिसरण उत्तम कार्य करतं. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी हिरवी मिरची खाण्याचा फायदाही आपल्याला मिळतो.

* हिरव्या मिरचीचे आरोग्यदायी फायदे :-

1. सायनस आणि दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर :-

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन असतं, जे नाकातील रक्त प्रवाह सुलभ करतं. त्यामुळे सर्दी आणि सायनसच्या समस्येपासून आराम मिळतो. थंडीच्या दिवसात हिरव्या मिरच्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरतं. ताज्या हिरव्या मिरचीचा एक चमचा रस मधात मिसळून रिकाम्या पोटी घेतल्यास दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो. हिरवी मिरची खाल्ल्याने उष्णता बाहेर पडते आणि त्याच वेळी वेदनाही कमी होते.

2. रोग प्रतिकारशक्ती वाढवणासाठी फायदेशीर :-

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लाट खूप वेगाने पसरली असताना डॉक्टरही त्यांना हिरवी मिरची खाण्याचा सल्ला देत होते. खरं तर, ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर रोज किमान एक हिरवी मिरची खाणे आवश्यक आहे,उदा., मिरचीचा ठेचा. हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराला बॅक्टेरियापासून मुक्त ठेवण्यास मदत करतात.

3.रक्ताभिसरण क्रिया सुधारते :-

हिरव्या मिरचीच्या तिखटपणाचे कारण म्हणजे मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन नावाचं कंपाऊंड. जे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. नसांमध्ये रक्ताचा प्रवाह चांगला झाल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्याही दूर होते.

4. मूड रिफ्रेशर :-

हिरवी मिरची खाल्ल्याने मेंदूतील अँडोर्फिन बाहेर पडतात. यामुळे आपला मूड खूप आनंदी राहतो. इतकंच नाही तर आपली दृष्टी वाढवण्यातही खूप मदत होते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.

5. चेहऱ्याची चमक वाढते :-

यामध्ये व्हिटॅमिन – ई आणि व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असल्याने चेहऱ्यावर चमक येते. व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-सी त्वचा निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात. हिरव्या मिरचीमध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. याशिवाय हे मेटाबॉलिज्मसाठीही हे चांगलं मानलं जातं.

Leave a comment

Your email address will not be published.