महाअपडेट टीम : हिवाळा हा ऋतू येतो पण अनेक पोषक तत्वांची भेट घेऊन येतो. हिवाळ्यात येणाऱ्या भाज्यांमध्ये अशा अनेक नावांचा समावेश आहे, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.यामध्ये मुळ्याचं देखील नाव येतं. परंतु लोक अनेकदा मुळा खाल्ल्यानंतर मुळ्याची पाने फेकुन देतात. खरं तर, मुळ्याच्या पानांमध्येही अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

अनेकांना मुळ्याच्या पानांपासून बनवलेली भाजी आवडते, परंतु मुळ्याच्या पानांपासून बनवलेल्या अशाच एका सुपर ड्रिंकबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? जे तुमच्या शरीराला आरोग्यदायी फायद्यासोबतच चवही वाढवतं.

मुळ्याच्या पानांचे काही खास पोषक घटक :-

मुळ्याच्या पानांमध्ये प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, क्लोरीन, सोडियम,आयरन, मॅग्नेशियम तसेच व्हिटॅमिन्स-ए, व्हिटॅमिन – बी आणि व्हिटॅमिन – सी असतं. हे सर्व पोषक घटक आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहेत.

मुळ्याच्या पानांपासून बनवलेले सुपर ड्रिंक कसं बनवाल ?

मुळ्याच्या पानांचे सुपर ड्रिंक बनवण्यासाठी प्रथम मुळ्याची पाने व्यवस्थित धुवा.
मुळ्याची पाने खराब होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या. कारण ती जमिनीत उगवणारी भाजी असल्याने कधीकधी पाने किडे खातात
पाने धुतल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून पाण्यात उकळून घ्या
आता हे पाणी वेगळ्या भांड्यात ठेवा आणि पाने वेगळी करा. आता पाने मिक्सरमध्ये बारीक करा.
आता चवीनुसार मीठ, थोडी ठेचलेली काळी मिरी आणि लिंबाचा रस घाला.
सकाळी अनुशापोटी याचे सेवन करा.

हे इफेक्टिव सुपर ड्रिंक तुमच्यासाठी आरोग्यात काय काय करू शकतं ?

1. वजन कमी करण्यास मदत करते :-

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अनेकजण डाएटिंग करतात, पण डाएटिंग करताना भूकही सहन होत नाही.अशा परिस्थितीत मुळ्याच्या पानांपासून बनवलेलं सुपर ड्रिंक खूप उपयुक्त ठरू शकतं. खरं तर, हे ड्रिंक भूक शमवण्यास मदत करतं, ज्यामुळे तुम्ही अनावश्यक काहीही खाणे टाळता. हे पेय प्यायल्यानंतर पोट बराच काळ भरल्यासारखं वाटतं.

2. हे ड्रिंक कॅन्सर सारख्या गंभीर आजारावरही फायदेशीर :-

मुळ्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी जास्त असतं, जे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतं. यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि अँथोसायनिन्स कॅन्सरशी लढण्यास मदत करतं. हे कोलन, पोट, किडनी आणि आतड्यांसारख्या घातक कॅन्सर पासून शरीराचे संरक्षण करते.

3. बद्धकोष्ठता दूर ठेवते :-

रोज सकाळी अनुषा पोटी मुळ्याच्या पानांचे हे पेय प्यायल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून लवकर सुटका मिळते. मुळ्याच्या पानांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असतं, जे पोटासाठी खूप चांगलं मानलं जातं.

4. हा रस कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी अमृत :-

मुळ्याच्या पानांमध्ये सोडियमचं प्रमाण चांगलं असतं, जे शरीरातील मीठाची कमतरता पूर्ण करतं . या कारणास्तव हे कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतं. यामध्ये असलेले अँथोसायनिन्स हृदयासाठी खपाचा फायदेशीर असून हृदय ठणठणीत ठेवतं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *