महाअपडेट टीम : फळांमध्ये पेरूला एक विशेष स्थान आहे. हे स्वादिष्ट गोड आणि आंबट फळांपैकी एक आहे जे खूप पौष्टीक आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते ताणतणाव कमी करण्यापर्यंत, मधुमेहाशी लढण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? हे सुपरफूड तुमची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी आश्चर्य कारक काम करू शकते.

हो… पेरू हाप्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करू शकतो. पेरूचे सेवन केल्याने महिलांमध्ये ओव्हुलेशन आणि प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते आणि गर्भधारणा होण्याचीही शक्यता वाढते. पेरूचं फळ बर्‍याचदा स्नॅक म्हणून खाल्लं जातं आणि पाने सामान्यतः हर्बल – टी मध्ये वापरली जातात, ज्याचं सेवन आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केलं जाऊ शकतं.

पेरूचे इतरही फायदे जाणून घ्या :-

1) हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. निसर्गातील व्हिटॅमिन-सी चा हा सर्वात चांगला स्रोत मानला जातो.

2) याचं सकाळी सेवन केल्यास मॉर्निंग सिकनेसवर खात्रीशीर इलाज होतो.

3) त्यात फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि डिहायड्रेशन कमी होण्यास मदत होते.

4) गरोदरपणात पेरू खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रित राहण्यास मदत होते.

5) पेरूच्या पानांचा अर्क अतिसार, मधुमेह आणि अपचन यासह अनेक रोग आणि लक्षणांवर रामबाण उपाय म्हणून केला जातो.

6) यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे गर्भधारणा, मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते.

7) साधारणपणे लोक पेरू कच्च्या स्वरूपात खातात. आणि हिवाळ्याच्या उन्हात थोडेसे काळे मीठ टाकून खाण्यात काय आनंद मिळतो हे तुम्हाला माहीत आहेच. पण जर तुम्हाला थोडासी रेसिपी करायला आवडत असेल, तर तुम्ही हे काम करून त्यातील स्वाद अजून वाढवू शकता…

चला जाणून घेऊया पेरूची रेसिपी :- 

1. पेरूची चटणी :
ही चटणी गरोदर किंवा स्तनपान करणा-या महिलांसाठी उत्तम आहे.

साहित्य :-
2/3 मध्यम आकाराचे पेरू घ्या.
1कप पुदिन्याची ताजी पाने घ्या.
2 लसणाच्या पाकळ्या घ्या
1कप ताजी कोथिंबीर घ्या.
1 इंच आलं घ्या.
अर्धा चमचा काळे मीठ
हिरवी मिरची (चवीनुसार)
1 चमचा भाजलेली जिरे पावडर घ्या.
2 चमचे लिंबाचा रस

पेरूची चटणी बनवण्याची साधी – सोपी रेसिपी :-

1) पेरूच्या बिया काढून त्याचे लहान तुकडे करा.
2) सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये टाका आणि मिक्स करून गुळगुळीत चटणी बनवा.
आवश्यक असल्यास थोडे पाणी देखील घालू शकता.
3) जेवणासोबत या हेल्दी चटणीचा आस्वाद घ्या.

 पेरू चाट :-

हा पौष्टीक नाश्ता मुलांसाठी योग्य आहे. हा स्वादिष्ट आणि निरोगी देखील आहे !

साहित्य :-
6 पेरू सोलून चिरून घ्या
2 ते 3 उकडलेले, सोललेले आणि चिरलेले बटाटे
चवीनुसार मीठ
2 चमचे लिंबाचा रस
1/2 चमचे साखर
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
3 चिरलेला हिरवा कांदा.
3/4 कप ताजी चिरलेली कोथिंबीर.
1 टीस्पून पुदिन्याची पाने

पेरू चाट कसा बनवाल :-
एका मोठ्या भांड्यात सर्व साहित्य एकत्र करा आणि लिंबाचा रस टाकून वरून कोथिंबीरीने सजवा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *