महाअपडेट टीम : फिल्म इंडस्ट्री खूप ग्लॅमरस आहे आणि त्याच्याशी संबंधित स्टार्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या लग्नाआधी दुसऱ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या.

ऐश्वर्या राय बच्चन – सलमान खान :-

ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खानचं नातं बरंच वादग्रस्त राहिलं आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, जेव्हा दोघे रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा दोघेही काही महिने लिव्ह-इनमध्ये होते. आता ऐश्वर्याचं लग्न बच्चन कुटुंबातील अभिषेक बच्चन सोबत झालं आहे.

प्रियांका चोप्रा- शाहिद कपूर :-

प्रियंका आणि शाहिदच्या प्रेमाबाबत खूपच हैराण करणार प्रकरण सामोरं आलं होतं. जेव्हा इन्कम टॅक्सची रेड प्रियांकाच्या घरावर पडली तेव्हा त्या ठिकाणी शाहिद कपूर आढळून आला. यामुळे ते बऱ्याच काळापासून लिव्हइन मध्ये राहत असल्याचं समोर आलं होतं. सध्या शाहिद कापूर त्याच्या वैवाहिक जीवनात खुश असून प्रियांका अन निकचा डिव्होर्स होण्याची शक्यता आहे.

दीपिका पदुकोण – रणबीर कपूर :-

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरचं नातं पूर्ण फिल्मी झालं आहे. त्याच्यात तर पार लग्नापर्यंत बोलणी झाली होती. रणवीरसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिका रणबीरसोबत लिव्ह इन मध्येही राहत होते.

बिपाशा बसू -जॉन अब्राहम :-

बिपाशा आणि जॉन बराच काळ एकत्र होते. लिव्ह-इन मध्ये राहिलेले. बिपाशा आणि जॉनच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहते नाराज झाले होते. आता दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूपच आनंदी आहेत.

लारा दत्ता-केली दोरजी :-

लारा दत्ता सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. लग्नाआधी लाराने केली दोरजीला डेट केलं होतं. आणि दोघेही लिव्हइन मध्ये होते.

नेहा कक्कर – हिमांश कोहली :-

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांचे नातं वादात सापडलं होतं. लग्नाआधी नेहा हिमांशसोबत लिव्ह इन होती.

करीना कपूर खान – शाहिद कपूर :-

करीना कपूर आणि शाहिद यांनीही एकमेकांना दीर्घकाळ डेट केले आहे. ‘जब वी मेट’च्या शूटिंगदरम्यान दोघांचं ब्रेकअप झालं होतं, मात्र त्याआधी दोघेही बराच काळ लिव्हइनमध्ये होते.

Leave a comment

Your email address will not be published.