महाअपडेट टीम : ‘कबीर सिंग’ चित्रपटाला प्रचंड यश मिळाल्यानंतर शाहिद कपूर आज बॉलीवूडमधील अव्वल अभिनेत्यांपैकी एक मानला जातो आणि इतकेच नाही तर ‘कबीर सिंग’ चित्रपटापासून पासून शाहिद कपूरची फॅन फॉलोइंग कमालीची वाढली आहे.
शाहिद कपूर केवळ ‘कबीर सिंग’ बनला नाही. तर फॅन फॉलोइंगमुळे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बनला आहे, याचा अंदाज त्याच्या ‘जर्सी’ या चित्रपटासाठी आकारलं जाणारं मानधन पाहून लावता येईल.
रिपोर्टनुसार, शाहिद कपूरने ‘जर्सी’ चित्रपटासाठी त्याच्या फीमध्ये वाढ केली आहे आणि ही फी शाहिद कपूरने त्याच्या अभिनय कारकिर्दीतील कोणत्याही चित्रपटासाठी आकारलेल्या फीच्या तुलनेत सर्वात जास्त आहे.
शाहिद कपूरने ‘जर्सी’ चित्रपटासाठी आकारलं इतकं मानधन :-
रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपये घेतो, मात्र शाहिद कपूरने ‘जर्सी’ चित्रपटासाठी आपली फी वाढवली आहे. रिपोर्टनुसार, ‘जर्सी’ हा चित्रपट शाहिद कपूरने 33 कोटी आणि काही टक्के नफ्याचा हिस्सा फी म्हणून आकारण्याच्या अटींवर साइन केला आहे. शाहिद कपूरच्या या मागणीवर निर्मात्यांनी देखील होकार दिला.
परंतू Covid 19 चा वाढता प्रभाव आणि चित्रपटसृष्टीला होणारं नुकसान यामुळे चित्रपटाच्या वाढत्या बजेटचा हवाला देत निर्मात्यांनी शाहिद कपूरला फी कमी करण्याची विनंती केली होती आणि रिपोर्टनुसार, निर्मात्यांची ही विनंती शाहीदने मान्य आली आहे. शाहिदने त्याच्या फीमध्ये 8 कोटींची कपात केली. त्यानंतर एकंदरीत, ‘जर्सी’ चित्रपटासाठी शाहिदने 25 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
इतकंच नाही तर बातमीनुसार, शाहिद कपूरने फीमध्ये कपात केली असली, तरी नफ्याच्या काही टक्के हिस्सा घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर्सी या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगले कलेक्शन केले तर शाहिद कपूर ‘जर्सी’ चित्रपटातून 35 ते 40 कोटी सहज कमवू शकतो.
शाहिद कपूर ‘जर्सी’ चित्रपटासाठी 25 कोटी आणि काही टक्के नफ्याचा वाटा घेत असला तरी ही खूप मोठी गोष्ट आहे पण, एक काळ असा होता जेव्हा शाहिद कपूरची फिल्मी कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर पोहोचली होती. परंतु कबीर सिंगने शाहिद कपूरला पुन्हा मोठी ओळख दिली.