महाअपडेट टीम : रणवीर सिंग कोण आहे व तो काय करतोय हे सांगायची आता कोणालाही गरज आता प्रत्येक जण त्याला ओळखत असेलच, आपल्या प्रचंड मेहनतीमुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे रणवीर सिंगने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आणि त्याच्या चित्रपटांनाही लोकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. हेच कारण आहे की, आज रणवीर सिंगचा चित्रपट असला तर तो हिट होण्याची गॅरंटी मिळते.

या वाढत्या लोकप्रियतेमुळे,आज प्रत्येक चित्रपट निर्मात्याला रणवीर सिंगसोबत कमी करण्याची इच्छा आहे, ज्यासाठी निर्माते रणवीर सिंग जी रक्कम मागेल ती देण्यासही तयार आहेत, ज्याचा अंदाज त्याच्या आगामी ’83’ चित्रपटासाठी आहे. रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंग त्याच्या आगामी ’83’ चित्रपटासाठी भरघोस फी आकारत आहे, त्यासोबतच तो 2021 मधील सर्वात महागड्या बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे.

रणवीर सिंगने ’83’ चित्रपटासाठी किती घेतलं मानधन :-

वृत्तानुसार, रणवीर सिंग एका चित्रपटासाठी सरासरी 15 कोटी घेतो, परंतु, बॉक्स ऑफिसवर त्याच्या मागील चित्रपटांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे रणवीर सिंगने त्याच्या फीमध्ये फेरबदल केले आहेत. रिपोर्टनुसार,रणवीर सिंग ’83’ चित्रपटासाठी त्याची सरासरी फी तसेच चित्रपटाच्या नफ्याचा मोठा हिस्सा घेत आहे, परंतु हा नफा किती आहे हे अजून त्याने उघड केलेलं नाही.

रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटांना मिळालेल्या जबरदस्त यशामुळे, रणवीर सिंगने ‘गली बॉय’ चित्रपटानंतर येणाऱ्या चित्रपटांसाठी सरासरी फीसह चित्रपटाच्या नफ्याच्या काही टक्के रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे. रणवीरच्या चित्रपटांना मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे निर्मात्यांना ही अट मान्य करायला काहीच हरकत नव्हती. इतकंच नाही तर फक्त ’83’ साठीच नाही तर रणवीर सिंग त्याच्या आगामी सर्व चित्रपटांसाठी सारखेच शुल्क घेत आहे.

’83’ हा एक बिग बजेट चित्रपट आहे आणि हा चित्रपट खूप मोठ्या स्तरावर बनवण्यात आला आहे. बातम्यांनुसार,’83’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सहज 100 कोटींची कमाई करेल. ’83’ हा चित्रपट यावर्षी 24 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *