महाअपडेट टीम : विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सही यावेळी लग्न करणार आहेत. अशा परिस्थितीत एक आश्चर्य चकित करणारी बातमी समोर येत आहे.

बॉलीवूडची दबंग गर्ल ‘सोनाक्षी सिन्हा’ देखील नववधू बनण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. आणि ती लवकरच लग्न करू शकते. शत्रुघ्न सिंहाची लाडकी मुलगी लवकरच सलमान खानचा भाऊ आणि सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवासोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

बंटी सचदेवा सलमानच्या जवळचा :-

बंटी सचदेवाचे सलमान खानसोबत खास कलेक्शन आहे. खरंतर, बंटी हा सलमानचा भाऊ सोहेल खानचा मेहुणा आहे. बंटी सचदेवा हा सोहेलची पत्नी सीमा खानचा भाऊ आहे. रिपोर्ट्सनुसार, बंटी सचदेवा सोनाक्षी सिन्हाच्या कुटुंबीयांना खूप आवडतो आणि ते वाट पाहत आहेत की, सोनाक्षी सिन्हा या लग्नाला कधी हो म्हणते? बंटी पीआर एजन्सी कॉर्नरस्टोनचा मालक आहे.

बंटी सचदेवासोबत सोनाक्षीचं नाव चर्चेत :-

34 वर्षीय सोनाक्षीचे नाव बंटी सचदेवासोबत खूप दिवसांपासून संबंध जोडले जात आहे, सोनाक्षी आणि बंटी अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत. तसेच सोनाक्षीने एका मुलाखतीत सांगितले होते की, बंटी एक सेल्फ मेड मॅन आहे आणि त्याला फक्त त्याचे बॅचलर हूड एन्जॉय करायचं आहे.

तसे सोनाक्षीचं नाव अर्जुन कपूर, शाहिद कपूर, झहीर इक्बाल आणि आदित्य श्रॉफ यांच्यासोबतही जोडले गेलं आहे. त्याचबरोबर बंटी आणि सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता हे दोघे लग्न कधी करतात हे पाहावे लागेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *