महाअपडेट टीम : सलमान खानचा ‘अंतिम ‘ हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो सा. रे. ग. म. पा शोमध्ये पोहोचला होता. आता हा शो, शनिवार-रविवारी टेलीकास्ट होणार आहे. त्याचा एक फनी प्रोमो सिंगर विशाल ददलानीने शेअर केला आहे. या टीजरमध्ये सलमान खान एका स्पर्धकाला विचित्र प्रकारचा माणूस म्हणताना दिसत आहे. प्रोमोचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीत उतरत आहे.
या शोमध्ये सलमान खानने गायलं गाणं :-
टीजरसोबत विशाल ददलानी यांनी लिहिले आहे की, ‘तू तर खूपच विचित्र माणूस आहेस रे…’ असं फक्त सलमान खानच बोलू शकतो. प्रोमोमध्ये सलमान खान स्वॅगसह शोमध्ये एन्ट्री घेतो. यानंतर तो स्पर्धकांसोबत ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील ‘आया मौसम दोस्ती का’ हे गाणं गाताना दिसत आहे.
गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर बनवला टॅटू :-
यानंतर कंटेस्टेंट दीपयन बॅनर्जी, सलमान खानला त्याच्या हाताचा टॅटू दाखवतो आणि सांगतो की, त्याच्या ब्रेकअपनंतर त्याने हा टॅटू त्याच्या हातावर बनवला. यावर सलमानने विचारले की किती वर्षे झाली, तर दीपयनने उत्तर दिले, 8, 9 वर्षे. यावर सलमान खान म्हणतो, ‘तू तर खूपच विचित्र माणूस आहेस रे…’ सलमानच्या तोंडून हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोकांना हसू आवरत नाही…
सलमानला नव्हतं करायचं आयुषला निराश :-
शोमध्ये सलमानसोबत अंतिम चित्रपटाचा अभिनेता आयुष शर्मा आणि महिमा मकवानाही आले होते. आयुष शर्माने चित्रपटाबद्दल सांगितलं होते की, सलमान खानसोबत चित्रपट करणं म्हणजे खूप दबाव आणि जबाबदारी होती. परंतु अशा मोठ्या स्टारसोबत काम करणे म्हणजे तुम्ही कठोर परिश्रम घेऊनच त्यांचा सामना करू शकता.